फसवणूक प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 30, 2015 00:34 IST2015-04-30T00:19:59+5:302015-04-30T00:34:48+5:30
बदनापूर : नोकरी देण्यासाठी पैसे घेऊन शिक्षण संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह अन्य एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दाभाडी येथील शिवाजी शिक्षण संस्थेत घडली.

फसवणूक प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
बदनापूर : नोकरी देण्यासाठी पैसे घेऊन शिक्षण संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह अन्य एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दाभाडी येथील शिवाजी शिक्षण संस्थेत घडली.
याबाबत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक बाजीराव निकम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाळासाहेब फकिरराव निकम व मुख्याध्यापक ए.के. खरात या दोघांनी संगनमताने मे २०१४ मध्ये संस्थेच्या कामकाजाबाबत अधिकार नसताना लोकांची दिशाभूल करून पैसे घेऊन नोकरी लावून दिली. त्यामुळे संस्थेची बदनामी झाली. दोन्ही आरोपींनी संस्थेचा व लोकांचा विश्वासघात केला. निकम यांनी याबाबतची तक्रार न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये बदनापूर पोलिस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पी.के. तायडे करीत आहेत. (वार्ताहर)