बजाजनगरात कॅरीबॅगचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:58+5:302021-02-05T04:10:58+5:30
----------------------------- वाळूजला मोकाट जनावरे वाढली वाळूज महानगर : वाळूजला मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे वाढल्याने नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन ...

बजाजनगरात कॅरीबॅगचा सर्रास वापर
-----------------------------
वाळूजला मोकाट जनावरे वाढली
वाळूज महानगर : वाळूजला मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे वाढल्याने नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरी वसाहतीत मोकाट जनावरांचा मुक्त संचार असून, ही मोकाट जनावरे लहान मुले व महिलांच्या अंगावर धावून जातात. मोकाट जनावरांकडून घरासमोरील झाडेही फस्त केली जात आहेत. अनेकदा ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने ये-जा करणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
--------------------
सिडको स्मशानभूमी रोडवर अस्वच्छता
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरील स्मशानभूमी रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. बजाजनगरातून सिडकोकडे जाणाऱ्या या रस्त्यावर भाजी-विक्रते व विविध व्यावसायिक केरकचरा आणून टाकतात. वाऱ्यामुळे केरकचरा रस्त्यावर पसरत असून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
---------------------