कार- दुचाकीचा अपघात; एक ठार
By Admin | Updated: August 20, 2014 23:55 IST2014-08-20T23:42:38+5:302014-08-20T23:55:15+5:30
गंगाखेड : गंगाखेड- परभणी महामार्गावरील आ.घनदाट यांच्या निवासस्थानाजवळ कार-दुचाकीचा अपघात झाला

कार- दुचाकीचा अपघात; एक ठार
गंगाखेड : गंगाखेड- परभणी महामार्गावरील आ.घनदाट यांच्या निवासस्थानाजवळ कार-दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
जिल्हा परिषद कृषी विभागाचे सभापती गणेशराव रोकडे हे गंगाखेडहून गाडीने (क्र.एम.एच.२२-टी ४१४७) परभणीकडे येत होते. त्यावेळी पालम तालुक्यातील वझूर येथील मुंजा उत्तम पवार व ओंकार रामेश्वर भिसे हे दोघे दुचाकीने (क्र.एम.एच.२२-वाय२२१८) गंगाखेडकडे जात होते. या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीवरील मुंजा उत्तम पवार (१८, रा.वझूर ता.पालम) हा जागीच ठार झाला. तर ओंकार रामेश्वर भिसे (२०, रा.वझूर ता. पालम) हा गंभीर जखमी झाला असून परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जि.प.चे कृषी व पशूसंवर्धन सभापती गणेशराव रोकडे हे या कारमध्ये होते. या अपघातामध्ये गणेशराव रोकडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.(प्रतिनिधी)