कार-टेम्पोची धडक; १५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:18 IST2018-05-12T01:18:02+5:302018-05-12T01:18:22+5:30

कार व टेम्पोच्या धडकेत १५ आचारी (स्वयंपाकी मजूर) जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता औरंगाबाद रस्त्यावरील कोल्ही शिवारात घडली. अपघातानंतर कारचालक पळून गेला. या घटनेत टेम्पोचालकासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

 Car-tempo striking; 15 people injured | कार-टेम्पोची धडक; १५ जण जखमी

कार-टेम्पोची धडक; १५ जण जखमी

वैजापूर : कार व टेम्पोच्या धडकेत १५ आचारी (स्वयंपाकी मजूर) जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता औरंगाबाद रस्त्यावरील कोल्ही शिवारात घडली. अपघातानंतर कारचालक पळून गेला. या घटनेत टेम्पोचालकासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
औरंगाबाद येथून २० जण टेम्पोमधून (एम एच २१ एक्स ७५९८) नाशिक जिल्ह्यातील येवला येथे लग्न समारंभासाठी जात होते. औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या कार (एम एच २० डी एफ ०३७९) व टेम्पोमध्ये जोराची धडक झाली. या धडकेमुळे टेम्पोचालकासह अन्य प्रवासी टेम्पोमध्ये फसले.
शिऊर पोलिस ठाण्याचे विशाल पडळकर, अविनाश भास्कर, वैजापूर ठाण्याचे सपोनि. रामहरी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना टेम्पोबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी औरंगाबादचे रहिवासी
जखमी मेराज खान, जया शेलार, प्रमिला आव्हाड, रुबीना बेगम, अलिम शेख यांना प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. शेख आफरिन, सायमा पठाण, मदीना पठाण, आमिना बेगम, नाजिया खान, शिरीन शेख, शेख सलीम बाबू, सुलताना शेख, आरेफा शकील, शाह, अविनाश मगरे, चंद्रकला शिंदे (सर्व रा.कटकटगेट औरंगाबाद) यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title:  Car-tempo striking; 15 people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात