तेलगाव रोडवर गावठी पिस्तूलसह कार जप्त
By Admin | Updated: March 19, 2017 23:18 IST2017-03-19T23:15:42+5:302017-03-19T23:18:48+5:30
बीड : शहरातील तेलगाव रोडवर पेठ बीड पोलिसांनी सापळा लावून एका कारमधून गावठी पिस्तूल जप्त केले

तेलगाव रोडवर गावठी पिस्तूलसह कार जप्त
बीड : शहरातील तेलगाव रोडवर पेठ बीड पोलिसांनी सापळा लावून एका कारमधून गावठी पिस्तूल जप्त केले. ही कारवाई रविवारी दुपारी एक वाजता करण्यात आली.
सौरभ उर्फ बाजीराव काकडे (रा. लोणावळा) असे आरोपीचे नाव आहे. तो मोटार चालक- मालक रक्षक संघटनेचा अध्यक्ष असून कार (एचआर- डब्ल्यू बी- ००६) मधून तेलगावमार्गे परळीकडे जात होता. त्याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यावरुन पेठ बीड ठाण्याचे सहायक फौजदार जहूर शेख, पोकॉ पाईकराव वाहुळ यांनी सापळा लावला. पिस्तूलसह कार जप्त केली असून काकडेला अटक केली आहे. विशेष म्हणजे शनिवारीच दरोडा प्रतिबंधक पथकाने नवगण राजुरीजवळ दोन तरुणांकडून एक गावठी पिस्तूल जप्त केले होते. (प्रतिनिधी)