कारला पिकअपची धडक

By Admin | Updated: May 19, 2014 01:05 IST2014-05-19T00:59:33+5:302014-05-19T01:05:03+5:30

माणकेश्वर : पिकअप वाहनाची कारला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात भीमाशंकर शुगर मिलचे अध्यक्ष सतीश लोढा यांच्यासह पाचजण जखमी झाले.

Car pickup pickup | कारला पिकअपची धडक

कारला पिकअपची धडक

माणकेश्वर : पिकअप वाहनाची कारला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात भीमाशंकर शुगर मिलचे अध्यक्ष सतीश लोढा यांच्यासह पाचजण जखमी झाले. हा अपघात भूम तालुक्यातील माणकेश्वरपासून तीन किमी अंतरावर असलेल्या वांगी फाट्यावर रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सतीश लोढा व त्यांचे इतर सहकारी एमएच २३/ वाय २५४९ या क्रमांकाच्या कारमधून परंड्याहून चौसाळ्याकडे जात होते. यावेळी वांगी फाट्याजवळ आल्यानंतर माणकेश्वरहून वांगीकडे जाणार्‍या पिकअप वाहन (क्र. एमएच २५/ पी ३७६५) ची त्यांच्या कारला जोराची धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील सतीश लोढा यांच्यासह रावसाहेब काळे, सतीश तोडकर, रामचंद्र बनगर, भाऊसाहेब घोडके व मधुकर अंधारे हे जखमी झाले. यातील भाऊसाहेब घोडके व रावसाहेब काळे यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती समजताच परंड्याचे पोना राजाभाऊ विधाते, पोकॉ राहुल गायकवाड, पोलिस पाटील पृथ्वीराज पाटील यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना बार्शी येथे उपचारासाठी हलविले. दरम्यान, परंड्याचे पोनि वाकडे यांनीही घटनास्थळास भेट दिली. (वार्ताहर)

Web Title: Car pickup pickup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.