कारची कंटेनरला धडक; कारचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST2020-12-30T04:06:58+5:302020-12-30T04:06:58+5:30

प्रणितसिंग हुडा हे मंगळवारी अमरावतीहून पुण्याकडे कार (क्र. एमएच-१४ सीके- ७०४२)ने जात होते. कायगाव येथे सकाळी ८ वाजेच्या सुमारास ...

The car hit the container; The driver was killed | कारची कंटेनरला धडक; कारचालक ठार

कारची कंटेनरला धडक; कारचालक ठार

प्रणितसिंग हुडा हे मंगळवारी अमरावतीहून पुण्याकडे कार (क्र. एमएच-१४ सीके- ७०४२)ने जात होते. कायगाव येथे सकाळी ८ वाजेच्या सुमारास हुडा यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कारने यावेळी दुभाजक ओलांडून पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच-४६- एएफ- ८३८५)ला जोराची धडक दिली. या अपघातात कारचालक प्रणितसिंग हुडा याचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. नागरिकांनी अपघातानंतर कारचालकाला गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी कंटेनर चालक महादेव श्रीमंत गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन हलगर्जीपणे स्वतःच्या ताब्यातील वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोहेकॉ. विजय भिल्ल करीत आहेत.

फोटो :

औरंगाबाद - पुणे राष्ट्रीय महामार्गावर कायगाव येथे मंगळवारी सकाळी कार कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात कारचा झालेला चुराडा.

Web Title: The car hit the container; The driver was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.