कारसह दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:40 IST2017-11-16T23:39:59+5:302017-11-16T23:40:06+5:30
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सूरजखेडा रस्त्यावर कारमधून नेण्यात येत असलेले देशी दारूचे बारा बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी गोरेगाव येथीलच असून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारसह दारूसाठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सूरजखेडा रस्त्यावर कारमधून नेण्यात येत असलेले देशी दारूचे बारा बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी गोरेगाव येथीलच असून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अवैध दारूबाबत माहिती मिळाल्याने गोरेगाव-कनेरगाव रस्त्यावर सुरजखेडा पाटीनजीक गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून एक कार थांबली. कारमधील दोघेजण पळून जात होते. त्यामुळे पोलिसांनी या कारची तपासणी केली असता त्यात देशीदारुच्या १२ बॉक्समध्ये एकूण २९ हजार रुपये किमतीच्या ५७६ बाटल्या आढळून आल्या. त्यावर बॅच क्रमांक १0५९ आहे. यावरून एम.एच.-१४ एच-६0५१ जप्त केली आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी मस्के यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली. तपास सहाय फौजदार कुमरेकर हे करीत आहेत.