कार अपघातात बँक व्यवस्थापक ठार

By Admin | Updated: May 3, 2016 01:08 IST2016-05-03T00:45:13+5:302016-05-03T01:08:32+5:30

कन्नड : कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील आलापूर फाट्यानजीक दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एका कारमधील प्रवासी ठार झाला.

In the car accident killed the bank manager | कार अपघातात बँक व्यवस्थापक ठार

कार अपघातात बँक व्यवस्थापक ठार


कन्नड : कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील आलापूर फाट्यानजीक दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एका कारमधील प्रवासी ठार झाला. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री उशिरा कन्नड रोडवर घडली.
मुकुंद परसराम जगताप (रा. गारखेडा, औरंगाबाद) यांचा अपघातात मृत्यू झाला. ते कन्नड येथील लोकविकास नागरी सहकारी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते सहकाऱ्यांसह कारने (क्र.एमएच २० बीएन ६४२४) कन्नडहून औरंगाबादकडे येत होते. औरंगाबादहून येणाऱ्या कारची (क्र.एमएच १८ डब्ल्यू ११२८) समोरासमोर धडक झाली. या अपघातात जगताप ठार झाले. त्यांचे सहप्रवासी करंजखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. उमेश जाधव, गुलाम जिलानी व चालक सुनील भारुका जखमी झाले. दुसऱ्या कारच्या चालकासह एकूण तेरा प्रवासी किरकोळ जखमी झाले.

Web Title: In the car accident killed the bank manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.