शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना द्यावा लागेल दिवसाआड हिशेब

By admin | Updated: September 16, 2014 01:36 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरू केले आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरू केले आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये प्लार्इंग स्क्वॉड तसेच निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र खर्च पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे प्लार्इंग स्क्वॉड, व्हिडिओ पथक, सांख्यिकी, उमेदवारांचा जमाखर्च पाहणाऱ्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील शासकीय कार्यालये, बीएसएनएल, जीटीएल, तसेच अन्य कार्यालयांच्या मालमत्तेवरील उमेदवार, तसेच पक्षांच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या वतीने प्रचारासाठी पोस्टर तसेच हँडबिल छापण्यात येतात. यासंबंधी मुद्रक, प्रकाशकाचे नाव, किती प्रती छापायच्या आहेत याची संख्या तसेच एक नमुना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले. शहरातील तीन मतदारसंघांची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय शासकीय कला महाविद्यालय, किलेअर्क येथे राहणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात आहेत. सहायक अधिकारी म्हणून अभय म्हस्के व सुमन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ४पश्चिम मतदारसंघाचे कार्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राहणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी रीता मेत्रेवार राहणार आहेत. तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे कार्यालय शासकीय तंत्रनिकेतन येथे तयार करण्यात येणार आहे. या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय राऊत व संगीता चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.४ प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अर्ज स्वीकृती, छाननी होणार असून, येथेच स्ट्राँगरूम राहणार आहे. तसेच त्या- त्या कार्यालयामध्ये मतमोजणीची प्रक्रियाही राबविण्यात येणार आहे.