शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'आयटीआय' नोकरभरतीत बनावट कागदपत्रे आढळल्यास उमेदवार बाद होणार

By राम शिनगारे | Updated: August 21, 2023 13:31 IST

राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात आठ पदांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर : आयटीआय संस्थांमधील सुरु असलेल्या नोकरभरतीमध्ये एकाच उमेदवाराने वेगवेगळ्या आठ पदांसाठी स्वतंत्र अनुभव प्रमाणपत्र सादर करून प्राथमिक गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. हा घोटाळा ' लोकमत ' ने उघडकीस आणल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढून उमेदवारांचे अनुभव प्रमाणपत्र पडताळणीमध्ये बनावट असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे पात्रताधारक शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात आठ पदांचा समावेश आहे. शेकडो उमेदवारांनी आठही पदांसाठीची एकाच कंपनीकडून वेगवेगळी बनावट अनुभव प्रमाणपत्रे हस्तगत करीत अर्ज केल्याचे परीक्षेनंतर जाहीर झालेल्या प्राथमिक गुणवत्ता यादीतून उघडकीस आले होते. याविषयी 'काय सांगता? ७७२ पदांच्या भरतीत घोटाळा! ' या मथळ्याखाली ' लोकमत ' ने शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. त्याची तत्काळ दखल घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने त्याच दिवशी सायंकाळी परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीच्या आधीन राहून १६ एप्रिल रोजी घेतलेल्या परीक्षेकरिता परवानगी देण्यात आली होती. तसेच प्राथमिक गुणवत्ता यादी ही तात्पुरती आहे. यानंतर उमेदवारांची निवड सूची प्रसिद्ध करून निवड सूचीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्र, कागदपत्रांची पडताळणीची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यात अनुभव प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे बनावट आढळल्यास संबंधित उमेदवार पुढील भरती प्रक्रियेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, असे संचालक दिगंबर दळवी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा

...तर हा उमेदवारांवर अन्याय ठरेलएकाच उमेदवाराने आठ पदांसाठी अर्ज केलेला असेल तर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय त्यास यादीतून वळगणे अन्यायकारक ठरले. त्यामुळे उमेदवारांच्या अनुभव प्रमाणपत्रांची पडताळणी करताना बनावट आढळल्यास संबंधितास भरती प्रक्रियेतूनच बाद ठरविण्याची कार्यवाही केली जाईल. एकापेक्षा अधिक पदांसाठी उमेदवार पात्र ठरल्यास ज्या पदावर रुजू होण्यास तो इच्छुक असेल त्या पदाचेच नियुक्ती आदेश जारी करण्यात येतील, असेही संचालक दळवी यांनी कळविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार