उमेदवारांचा आज फैसला

By Admin | Updated: May 16, 2014 00:18 IST2014-05-16T00:02:24+5:302014-05-16T00:18:44+5:30

परभणी: या लोकसभा मतदार संघात शुक्रवारी मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

The candidates today decide | उमेदवारांचा आज फैसला

उमेदवारांचा आज फैसला

ु परभणी: या लोकसभा मतदार संघात शुक्रवारी मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. एक महिन्यापासून ताणून धरलेल्या उत्सूकतेला मतमोजणी अंती पूर्णविराम मिळणार आहे. परभणी लोकसभा मतदार संघात एका जागेसाठी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांबरोबरच सर्वच उमेदवारांनी प्रचारात जोर लावत आपली बाजू मतदारांसमोर ठेवली. यावेळच्या निवडणुकीत वेगवेगळ्या मार्गाने प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. त्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत भरली होती. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याने उमेदवार, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांच्याबरोबरच मतदारांमध्येही उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजय भांबळे, शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.बंडू जाधव, बसपाचे गुलमीर खान, आपच्या सलमा कुलकर्णी या प्रमुख उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सूकता आहे. प्रचार दरम्यान अनेक घडामोडी झाल्या. त्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? हे उद्या दुपारनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रशासनाने निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. पाचशे कर्मचारी बंदोबस्त कामी नियुक्त केले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी होईल. त्यानंतर ८.३० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी विद्यापीठात दोन प्रोजेक्टरची व्यवस्था केली आहे. सर्व नागरिकांपर्यंत निकाल पोहोचविण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. नागरिकांना परभणी लोकसभा मतदार संघाच्या निकालाबरोबरच संपूर्ण देशाच्या निकालाची उत्सूकता आहे. त्यामुळे १६ मे रोजी निकाल ऐकण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. टीव्हीसमोर देशभरातील निकाल ऐकण्याचे नियोजनही अनेकांनी केले आहे. शासकीय कर्मचार्‍यांनी देखील सुटी टाकून निकाल ऐकण्यासाठी खास नियोजन केले आहे. निकाल ऐकण्यासाठी व्यत्यय येऊ नये म्हणून आधीच कामे उरकून घेतली आहेत. (प्रतिनिधी) पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त मतमोजणी बंदोबस्तासाठी चार पोलिस उपाधीक्षक,पाच पोलिस निरीक्षक, ४० पोलिस अधिकारी, ४०० कर्मचारी, १ आरसीबी प्लाटून, १ सीआरपीएफ प्लाटून, १ एसआरपी प्लाटून तसेच दंगा काबू पथक व वाहतूक व्यवस्थेचे कर्मचारी असा अतीशय चोख बंदोबस्त मतदान मोजणी केंद्राभोवती आहे. तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी व काही राजकीय व्यक्तीच्या घराभोवती पोलिसांचे फिक्स पॉर्इंट तैनात करण्यात आले. गुलमीर खान (बसपा ), संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव (शिवसेना), विजय माणिकराव भांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), कॉ.राजन क्षीरसागर (भाकप), अ‍ॅड.अजय सीताराम करंडे पाटील (सपा), अशोक बाबाराव (अंभोरे) दुधगावकर (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), मो.इलियास मो.अमीर मणियार (भारिप), बबन (अण्णा) मुळे (बहुजन मुक्ती पार्टी), सय्यद अब्दुल रहीम (वेल्फेअर पार्टी आॅफ इंडिया), सलमा श्रीनिवास कुलकर्णी (आप), शेख सलीम (मजलिस बचाव तहेरिक ), उद्धव रंगराव पवार (पाटील) (अपक्ष), प्रदीप महादेव काजळे (अपक्ष), निसार सुभान खान पठाण (अपक्ष), प्रमोद मारोती पंडितकर (अपक्ष), कॉ.गणपत देवराव भिसे (अपक्ष), रामराव धनसिंग राठोड सर निरंकारी (अपक्ष)

Web Title: The candidates today decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.