शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सभेला एक लाख लोक आले तरच उमेदवारीचा विचार; उदय सामंतांचा खळबळजनक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 19:03 IST

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकवाक्यता ठेवावी, परस्परविरोधी चर्चा बंद करावी, उदय सामंत यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या २० ऑगस्टपासून मराठवाड्यात सभा होतील. या सभांना एक लाख लोक आले तरच, आमदारांच्या उमेदवारीचा विचार होईल, अन्यथा तिकीट कापले जाईल, असा इशाराच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे महायुतीच्या आमदारांना दिला. सामंतांच्या इशाऱ्याने आमदारांमध्ये खळबळ उडाली.

संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी महायुतीच्या मराठवाडा पदाधिकारी समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला उद्योग मंत्री सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाट, आ. अनिकेत तटकरे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. रमेश कराड, आ. तानाजी मुटकुळे, आ. ज्ञानराज चौघुले, माजी मंत्री अर्जुन खोतकर, कैलास पाटील, शिंदेसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरत राजपूत, भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय खंबायते, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख अभिजित देशमुख आणि समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन जाेशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आ. तटकरे यांनी प्रास्ताविक केले.

सामंत म्हणाले की, शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपसातील हेवेदावे दूर ठेवून एकसंधपणे निवडणूक जिंकायची आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकवाक्यता ठेवावी, परस्परविरोधी चर्चा बंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होऊ द्यायचे नाही.

खा. भुमरे म्हणाले की, महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम केल्याने छत्रपती संभाजीनगरचा गड जिंकला. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ९ जागा महायुतीने जिंकायच्या आहेत. खा. डॉ. कराड, आ. शिरसाट यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सरकारने सर्व घटकांसाठी योजना आणल्याचे नमूद केले.

सावत्र भावांना लोळवायचेलाडक्या बहिणींबद्दल वाईट विचार करणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोळवायचे असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपये मंजूर केल्याचे सावे म्हणाले.

२० सप्टेंबर रोजी आचारसंहिता३८ दिवसांनी अर्थात २० सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता सावे यांनी व्यक्त केली. १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होईल. यामुळे पुढील दिवसांत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahayutiमहायुती