‘कॅन्सर’ रूग्ण वाऱ्यावर !
By Admin | Updated: February 4, 2015 00:40 IST2015-02-04T00:39:05+5:302015-02-04T00:40:43+5:30
उस्मानाबाद : तंबाखूमुळे होणारा कर्करोग असो अथवा महिलांच्या विविधांगांना होणारा कर्करोग असो या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी सुविधा जिल्हा रूग्णालयात

‘कॅन्सर’ रूग्ण वाऱ्यावर !
उस्मानाबाद : तंबाखूमुळे होणारा कर्करोग असो अथवा महिलांच्या विविधांगांना होणारा कर्करोग असो या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी सुविधा जिल्हा रूग्णालयात उपलब्ध नाही़ केवळ शिबिरे घेवून ‘दक्षता’ घ्या, असे सांगण्यावरच समाधान मानण्यात येत आहे़
देशात तंबाखू, सिगारेटमुळे होणाऱ्या कर्करोगाने ८ ते ९ लाख नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते़ तर दररोज २२०० जणांचा मृत्यू होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्या येते़ तंबाखूमधील निकोटीन, टर, कार्बन मोनॉक्साईड या विषकारक रसायनामुळे तोंड, घसा, फुफूस, स्वरयंत्र, अन्ननलिका, नपुसंकता, महिलांमध्ये वंध्यत्व आदी प्रकार घडतात़ तसेच पुरूषांना तोंडाची पोकळी, फुफूस, अन्ननलिका, पोटातील कॅन्सर होवू शकतो़ तर महिलांना गर्भाशय, स्तन व तोंडाची पोकळीतील कॅन्सर तंबाखू सेवनाने जडतो़ कर्करोग हा १०० हून अधिक रोगांचा एक गट असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येते़ या कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर तो औषधोपचाराने, शस्त्रक्रियांनी बराही होतो़ वेळेत निदन करण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर प्रसंगी संबंधित रूग्णाचा मृत्यू होतो़ जीवघेण्या कर्करोगाविषयी प्रशासनाकडून प्रतीवर्षी कर्करोग दिनानिमित्त शिबीर घेवून मार्गदर्शन करण्यात येते़ एखाद्याला तपासणी करायची म्हटले की, खासगी रूग्णालय गाठावे लागत आहे़ तेथेही आवश्यक ते उपचार मिळत नसल्याने सोलापूर, लातूर किंवा बार्शी येथील रूग्णालयात रूग्णांना जावे लागत आहे़ जिल्हा रूग्णालयात एखाद्याला कर्करोग झाल्याचेही निदान होवू शकत नाही़ कर्करोग तपासणीसाठी लागणारी यंत्रणाही जिल्हा रूग्णालयात नाही़ त्यामुळे रूग्णांना खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जावून त्यांच्या सल्ल्यानुसार परजिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)
जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील इतर रूग्णालयातही कर्करोगाचे निदान करणे, शस्त्रक्रिया करणे आदी प्रक्रिया होत नाहीत़ त्यामुळे रूग्णांना कर्करोगाचे निदान करण्यासाठी इतर जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत आहे़ परिणामी आर्थिक, मानसिक त्रास या रूग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत आहे़
शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (‘एनसीडीसी’) मधूमेह, उच्चरक्तदाबाच्या रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे़ या कार्यक्रमांतर्गतच भविष्यात कर्करोगाची तपासणीही करण्यात येणार आहे़ त्यामुळे कर्करोगाचे निदान वेळेत होणाऱ्या संबंधित नागरिकांना याचा लाभ होणार आहे़
जिल्हा रूग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे म्हणाले, जिल्हा रूग्णालयात कर्करोगाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येते़ प्राथमिक स्तरावरील कर्करोग असलेल्या रूग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात येते़ प्राथमिक स्तराच्या पुढील कर्करोग असेल तर मात्र, सोलापूरकडे रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येते़ मात्र, जिल्हा रूग्णालयाने किती शस्त्रक्रिया केल्या, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले़