वसतिगृहाचा भोजन ठेका रद्द

By Admin | Updated: May 11, 2015 00:31 IST2015-05-11T00:27:39+5:302015-05-11T00:31:13+5:30

उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्याना देण्यात आलेल्या जेवणातील दह्यामध्ये अळ्या निघाल्या होत्या.

Cancellation of hostel food contract | वसतिगृहाचा भोजन ठेका रद्द

वसतिगृहाचा भोजन ठेका रद्द


उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्याना देण्यात आलेल्या जेवणातील दह्यामध्ये अळ्या निघाल्या होत्या. या गंभीर प्रकरणानंतर समाजकल्यान विभागाने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली होती. परंतु, नोटिसेचा खुलासा वेळेत सादर न केल्याने सदरील भोजन ठेका रद्द करण्यात आला असून निविदाही मागविण्यात आल्या आहेत.
आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने शहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सुरु करण्यात आले. येथे शिक्षण, निवासासोबतच जेवणाचीही सुविधा पुरविण्यात येते. त्यामुळे वसतिगृहामध्ये संख्याही मोठी आहे. परंतु, येथे वास्तव्यास असलेल्या या विद्यार्थ्यांना शासनाच्या निकषानुसार सुविधा मिळत नसल्याची ओरड होत होती. असे असतानाच १८ एप्रिल २०१५ रोजी विद्यार्थ्यांना जेवनासोबत दिलेल्या दह्यामध्ये अळया निघाल्याचा प्रकार समोर आला होता. सदरील प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला होता. याची दखल घेत समाजकल्याण अधिकारी एस. के. मिनगिरे यांनी सदर वसतिगृहाच्या ठेकेद्दारस नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, संबंधित ठेकेदाराने वेळेमध्ये नोटिसेचे उत्तर दिले नाही. विशेष म्हणजे, जेवनाच्या दर्जाबाबतही विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिनगिरे यांनी संबंधित ठेकेदाराचा भोजन पुरवठ्याचा ठेका रद्द केला. (प्रतिनिधी)

Web Title: Cancellation of hostel food contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.