शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

...बघा काही करता येते का ? बेरोजगार मतदाराची उमेदवाराला आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 22:19 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्यात काही गटासाठी निवडणूक घेण्यात आली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्यात काही गटासाठी निवडणूक घेण्यात आली. त्या गटातही एका मतपत्रिकेत एका महिला उमेदवारासमोर मतदाराने ‘तुमची निवडणूक लढविण्याची लायकी नाही’ अशी कॉमेंट केली होती. यानंतर दुस-या टप्प्यात पदवीधर गटासाठी सोमवारी (दि. ४) मतदान झाले. यात पदवीधरांनी १० जागांसाठी मतदान केले. या मतांची मतमोजणी गुरुवारी (दि. ७) सकाळी दहावाजेपासून सुरू आहे. सुरुवातीला मतमोजणी केंद्रातील अधिकारी चार जिल्ह्यातील मतपत्रिकांचे एकत्रीकरण करत खुल्या आणि राखीव गटातील मतपत्रिका वेगवेगळ्या करत होते. या मतपत्रिका वेगळ्या करण्यास उशिर होत होता. सर्व उमेदवार आणि समर्थकांमध्ये याविषयी नाराजी वाढत होती. तेवढ्यात निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांनी घोषणा केली. मतपत्रिकेसोबत एका मतदाराने उमेदवारांकडून अपेक्षा व्यक्त केल्याची चिठ्ठी जोडली असल्याचे सांगितले.तसेच या मतदाराने उमेदवारांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्या अपेक्षा डॉ. सरवदे यांनी वाचून दाखवल्या. तेव्हा सर्वत्र हशा पिकला. मात्र या चिठ्ठीतील मतदाराने व्यक्त केलेल्या भावनेतून भीषण बेकारीचे वास्तव समोर आले आहे. अनेकांना नोकरी मिळत नसल्यामुळे लग्नसुद्धा जमत नसल्याचे सांगितले. यामुळे युवकांचे वय खूप पुढे गेले असल्याचे वास्तवही चिठ्ठीमध्ये मांडण्यात आले. ‘आज रोजी ग्रॅज्यूएट असलेल्या मुलगा उमेदवाराचे लग्न करताना कायमस्वरुपी नोकरी नसल्याने अडचणी येतातच. मुलगी म्हणजे जॉब सेक्युअर पाहिजे. हा मुद्दा निवडणुकीचा जरी नसला तरी जीवनाकरिता महत्त्वाचा आहे. अनेक लग्नाच्या मुला/मुलींची लग्ने न झाल्याने वय ३५/४० झाले आहे. तरी कायम व फिक्स पे का होईना जॉब मिळाला पाहिजे. अनेक इंजिनीअर्स, डॉक्टर्स, बीए, एमए, बीएस्सी, एमएस्सी, बीकॉम, एमकॉम बेकार आहेत. जॉब सेक्युलर नाहीत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद