बुढीलेन पोटनिवडणुकीत काँग्रेसची पुन्हा बाजी...!
By Admin | Updated: July 1, 2014 01:08 IST2014-07-01T00:56:03+5:302014-07-01T01:08:37+5:30
औरंगाबाद : कबाडीपुरा, बुढीलेन वॉर्ड क्र. ३२ मध्ये पोटनिवडणुकीत काँगे्रसने बाजी मारली.

बुढीलेन पोटनिवडणुकीत काँग्रेसची पुन्हा बाजी...!
औरंगाबाद : कबाडीपुरा, बुढीलेन वॉर्ड क्र. ३२ मध्ये पोटनिवडणुकीत काँगे्रसने बाजी मारली. दिवंगत नगरसेवक मिर्झा सलीम बेग यांचे चिरंजीव झाकेर मिर्झा बेग यांनी २ हजार ५२१ मते घेऊन विजय मिळविला. वॉर्डावर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे.
बेग यांनी अपक्ष उमेदवार अहमद खलील अहमद यांचा १,४१७ मतांनी पराभव केला, तर शिवसेनेचे उमेदवार योगेश हिवराळे हे ९५९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
आज सकाळी मनपाच्या इमारत क्र. ३ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, उपायुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वा. मतमोजणी सुरू झाली. १० वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. १३ बुथवर मतदान झाले होते. निवडणूक मैदानात काँग्रेस, शिवसेनेसह ९ उमेदवार होते. काल २९ रोजी पोटनिवडणुकीसाठी ५२.९० टक्के मतदान झाले. काँगे्रसचे नगरसेवक मिर्झा सलीम बेग यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली. झाकेर मिर्झा बेग हे विजयी होताच इमारत क्र. ३ च्या आवारात जल्लोष करण्यात आला.
मतदार आणि मतदान
वॉर्डात एकूण १० हजार ७१८ मतदार आहेत. त्यापैकी ५,६७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३,१५७ पुरुष आणि २,५१३ महिला मतदारांचा समावेश होता.
असा हा योगायोग
दिवंगत नगरसेवक मिर्झा सलीम बेग यांना एकूण १,४०० मते होती, तर झाकेर मिर्झा बेग यांना १,४१७ मतांचे मताधिक्य मिळाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे विजय मिळाल्याचे झाकेर मिर्झा बेग यांनी सांगितले.