शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत ३७़१ % मतदान

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

नांदेड: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ३७़ १ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण ११ हजार ७७४ पैकी ४ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले़

नांदेड: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ३७़ १ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण ११ हजार ७७४ पैकी ४ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले़२९ जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत प्रभागातील १६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली़ नांदेड महापालिकेतील प्रभाग क्रं़ ९ मधील (कैलासनगर, श्रीनगर ) काँग्रेसचे नगरसेवक सुधाकर पांढरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़ त्यानंतर या रिक्त पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली़ या निवडणुकीतील अब्दुल रज्जाक अब्दुल वहाब,(अपक्ष), आगाशे अनुप श्रीराम, (अपक्ष) , खेडकर प्रमोद मुरलीधर, (शिवसेना) , शेख अफसर शेख बाबू, (राष्ट्रवादी काँग्रेस), मंगला महादेवराव निमकर, (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), शेख अस्लम ऊर्फ मुन्नाभाई खोकेवाला, (अपक्ष), वाजीद जहागीरदार,(इंडियन युनियन मुस्लिम लीग) या सात उमेदवारांचे भविष्य मतदारांनी मतदान यंत्रात बंद केले़३७़०१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण ११ हजार ७७४ पैकी ४ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले़ यामध्ये ५ हजार ९९५ पैकी २ हजार ३८८ पुरूष तर ५ हजार ७७९ महिला मतदारांचा समावेश आहे़ यापैकी १ हजार ९६९ महिला व २ हजार ३८८ पुरूष मतदारांनी मतदान केले़ मतदन केंद्र क्रमांक ६ वर सर्वाधिक मतदान ५७़७९ टक्के तर सर्वात कमी २०़२२ टक्के मतदान केंद्र क्रमांक ११ वर झाले़ सकाळी सातेसात ते साडेनऊ या वेळेत ४़ ७३ टक्के, साडेनऊ ते साडेआकरा या वेळेत केवळ १२़९२ टक्के, साडेअकरा ते दीड या वेळेत २२़४६ टक्के तर दीड ते साडेतीन या वेळेत २९़६५ मतदान झाले़ निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र खंदारे, गुलाम सादेक, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, शिवाजी बाबरे, सुनील देशमुख, दिलीप टाकळीकर, रमेश चवरे, वानखेडे, इनामदार, महमद युनूस यांनी निवडणूक प्रक्रियेत काम केले़ १६ मतदान केंद्रासाठी १८ मतदान केंद्राध्यक्ष, १०० मतदान कर्मचारी, १०० पोलिस कर्मचारी कार्यरत होते़ सहायक पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक आऱ ए़तासीलदार, भाग्यनगरचे पालीवाल यांनी बंदोबस्त ठेवला़ (प्रतिनिधी)सोमवारी मतमोजणी सोमवारी सकाळी ९ वाजेपासून स्टेडियम परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे़ या प्रकियेसाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली असून चार फेऱ्या होतील़ प्रत्येक टेबलवर चार मतदान यंत्रामधील मतांची मोजणी केली जाईल़ सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे़