शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

टायरअभावी उभ्या बसेस; दररोज १ लाखांचा फटका

By admin | Updated: August 23, 2014 00:47 IST

किनवट : वाहकांची विविध पदे रिक्त, सुट्या भागांचीही वाणवा आणि टायर नसल्याने ९ बसेस आगारातच उभ्या असल्याने यापोटी दररोज १ लाख रुपयांचा फटका किनवट आगाराला बसत आहे.

किनवट : वाहकांची विविध पदे रिक्त, सुट्या भागांचीही वाणवा आणि टायर नसल्याने ९ बसेस आगारातच उभ्या असल्याने यापोटी दररोज १ लाख रुपयांचा फटका किनवट आगाराला बसत आहे. याकडे आगाराच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्याच्या दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आगाराच्या विविध समस्या आहेत. या आगारात ४५ गाड्या आहेत. अनेक गाड्या कालबाह्य झाल्या. गाड्यांची अवस्था खराब असल्याने रस्त्यातच गाड्या बंद पडतात. किनवट येथून जाणाऱ्या रेल्वे तसेच खाजगी प्रवासी यांना तोंड देत कमी मनुष्य बळावर आगाराने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न चालवले आहेत. या प्रयत्नामुळे दररोज चार लाख रुपयांचे उत्पन्न किनवट आगाराला मिळत आहे. असे असताना मात्र किनवट आगारात वाहकांची २७ पदे रिक्त आहे. गाड्यांची देखभाल करण्यासाठी सुटे भाग उपलब्ध नाहीत. टायरचा दुष्काळ असल्याने ९ गाड्या आगारात निव्वळ उभ्या आहेत. वाहकाची पदे रिक्त व टायरअभावी गाड्या उभ्याच असल्याने चालक रिकामे फिरत आहेत. पर्यायाने चालकांना सक्तीची रजा दिली जात आहे. टायर नाही, सुटे भाग नाही, वाहकाची रिक्त पदे त्यातच खाजगी प्रवासी वाहतुकीला जोर व सद्या तालुक्यावर ओढावलेली दुष्काळी परिस्थिती असतानाही आगार उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. (वार्ताहर)