सावकारी पाशामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

By Admin | Updated: December 11, 2014 00:46 IST2014-12-11T00:12:25+5:302014-12-11T00:46:36+5:30

औरंगाबाद : सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आपल्या सिडको एन-१ भागातील दुकानातच फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.

Businessman suicides due to lucrative money | सावकारी पाशामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

सावकारी पाशामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

औरंगाबाद : सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आपल्या सिडको एन-१ भागातील दुकानातच फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.
राजेश अंगद पाटील (४०, रा. पुंडलिकनगर) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. पाटील हे मूळचे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एन-१ भागात भारत बाजारमध्ये मातोश्री व्हील केअर नावाचे टायर विक्री व दुरुस्तीचे दुकान टाकले होते. दुकानासाठी त्यांनी एका खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेले होते. कर्जापूर्वीच सावकाराने त्यांच्याकडून काही कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षऱ्या घेतलेल्या होत्या. पाटील यांनी कर्जाची रक्कमही फेडली होती; मात्र सावकाराने आणखी बाकी असल्याचे म्हणत पैशांची मागणी सुरू केलेली होती. पैसे दिले नाही तर केस करील, अशी सावकार धमकी देत होता. त्यातूनच ते वैतागून गेले होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री पाटील दुकानात गेले. आतमध्ये पत्र्याच्या अँगलला दोरी अडकवीत त्यांनी फाशी घेत आत्महत्या केली. सकाळी दुकानात काम करणारे माणिक शहा हे दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सिडको एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना तेथे एक चिठ्ठी सापडली असून ती पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली आहे. या चिठ्ठीत त्यांनी सावकाराचा उल्लेख केलेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title: Businessman suicides due to lucrative money