शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

व्यावसायिकाला कर सल्लागारेनच फसवले; बनावट बिलांद्वारे ७३ लाखांंचा जीएसटी घोटाळा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:26 IST

ज्याच्या हाती दिली तिजोरीची चावी त्यानेच केली चोरी; जीएसटी खात्याचा वापर करून फसवणूक केल्याचे उघड होताच व्यावसायिकालाच दिल्या धमक्या

छत्रपती संभाजीनगर : गेवराईस्थित व्यावसायिकाच्या जीएसटी खात्याचा वापर करून शहरातील कर सल्लागाराने जीएसटी पोर्टलवर बनावट बिले अपलोड करत ७३ लाख ६३ हजारांचा घोटाळा केला. गाेविंद सत्यनारायण लाहोटी (रा. विनायक पार्क, देवळाई) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मधुसूदन सोनी (रा. गेवराई) यांचा व्यवसाय आहे. ऑगस्ट, २०१७ मध्ये त्यांनी लाहोटीमार्फत जीएसटीचे प्रमाणपत्र काढले होते. तेव्हापासून लाहोटीच त्यांचे करासंदर्भात कामकाज पाहत होता. जीएसटी खात्याच्या नोंदणीवेळी लाहोटीने स्वत:चाच मेल, मोबाईल क्रमांक नोंदवला. त्यामुळे सोनी यांना कुठलाच ओटीपी येत नव्हता. लाहोटी परस्पर त्यांचे व्यवहार सांभाळत होता. २७ नोव्हेंबर रोजी सोनी यांना जीएसटी कार्यालयामधून पहिली नोटीस आली. तेव्हा त्यांना हा घोटाळा समजला. त्यानंतर त्यांनी जीएसटी खात्याकडे स्वत:च्या मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंद केली.

घोटाळा करून व्यावसायिकालाच धमक्याघोटाळ्याविषयी सोनी यांनी लाहोटीला विचारणा केली, तेव्हा त्याने गैरव्यवहार झाल्याचे मान्य करत प्रकरण मिटवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु पोलिसांत तक्रार न करण्यास धमकावले. ६ व ३१ जानेवारी रोजी पुन्हा सोनी यांना नोटिसा आल्या. तेव्हा लाहोटीने त्यांच्या जीएसटी खात्यावरून अन्य व्यक्ती व व्यवसायांच्या नावे बोगस बिले केल्याचे निष्पन्न झाले.

व्यवसायाच्या नावे कोट्यवधींचे व्यवहारलाहोटीने ध्रुव ट्रेडिंग, एम. एस. ट्रेडिंग, ग्लोबल ट्रेडिंग अँड कंपनीच्या नावे २०२३-२४ मध्ये खोटी खरेदी दाखवत ८३ लाख ८ हजार व त्यावरील वस्तू व सेवाकर १६ लाख ४३ हजार तसेच २०२४-२५ मध्ये १ कोटी ३५ लाख ४२ हजारांची बनावट खरेदी दाखवून त्यावर ३४ लाख ९२ हजारांच्या सेवाकराची नोंद करत गैरव्यवहार केला. २०२२-२३ मध्येही ७३ लाख ६३ हजारांचा घोटाळा केला. पोलिस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर