बसची ट्रकला धडक, ५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:50 IST2017-08-06T23:50:57+5:302017-08-06T23:50:57+5:30
बस ट्रकला धडकून झालेल्या अपघातात ट्रक चालकासह चार प्रवासी जखमी झाले. जालना-राजूर रस्त्यावरील तपोवन फाट्यावर रविवारी दुपारी ही घटना घडली.

बसची ट्रकला धडक, ५ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : बस ट्रकला धडकून झालेल्या अपघातात ट्रक चालकासह चार प्रवासी जखमी झाले. जालना-राजूर रस्त्यावरील तपोवन फाट्यावर रविवारी दुपारी ही घटना घडली.
यावलहून लातूरला जाणारी या बस (एमएच,२० बीएल ६७६३) समोर असलेल्या मालवाहू ट्रकने (एमएच, २३ बीडब्ल्यू ११२३) तपोवन फाट्यासमोर अचानक बे्रक दाबले. त्यामुळे भरधाव बस या ट्रकला धडकली. यामध्ये बसमधील संजय गतखणे (२० रा. कासोद), विमलबाई चंपालाल डोंगरे (रा. जालना), कविता ज्ञानेश्वर शेवाळे (३५ रा. नांदखेडा), याशीम बेग अजान बेग (४२ रा. सेलगांव) हे प्रवासी जखमी झाले.
अपघातानंतर बसमधील संतप्त प्रवाशांनी ट्रक चालक भीमा बाळाभाऊ यादव (४५, गेवराई) यांना मारहाण केल्याने तेही जखमी झाले.
माहीती मिळताच राजूर पोलीस चौकीचे साहाय्यक फौजदार एकनाथ पडूळ, जमादार प्रताप चव्हाण, विष्णू बुनगे, संतोष वाढेकर, जगदीश बावणे, शिवाजी फुके यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
जखमी प्रवाशांच्या नाक, चेहरा व हाताला मार लागलेला आहे. या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत राजूर पोलिसात कुठलीही
नोंद नव्हती.