बस-कारची धडक; दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 17, 2015 01:04 IST2015-08-17T00:57:32+5:302015-08-17T01:04:25+5:30

नळदुर्ग : भरधाव वेगातील कार- सीटीबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला़ तर तिघे गंभीर जखमी झाले असून

Bus-car strikes; Death of both | बस-कारची धडक; दोघांचा मृत्यू

बस-कारची धडक; दोघांचा मृत्यू


नळदुर्ग : भरधाव वेगातील कार- सीटीबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला़ तर तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सोलापूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ हा अपघात रविवारी दुपारी सोलापूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील धनगरवाडी (ता़तुळजापूर) पाटीजवळ घडला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील धनगरवाडी पाटीजवळ रविवारी दुपारी नळदुर्गकडे निघालेली सोलापूर महानगर पालिकेची सीटी बस (क्ऱएम़एच़१३- ए़एक्स़ ९५२०) व मुरूम येथून पुण्याकडे जाणारी कारची (क्ऱएम़एच़१४- सी़एक्स़४३५३) समोरासमोर धडक झाली़ या अपघातात कारमधील ज्ञानेश्वर कोंडीबा भूजबळ (वय-३८ रा़ वडगाव गांजा ता़लोहारा ह़मु़पुणे) व लक्ष्मीबाई बळी गिराम (वय-७० रा़ वडगाव वाडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला़ तर या अपघातात केतन सिद्रामप्पा कारभारी (वय- २८ रा़ जळकोट), शांतेश्वर शिवराज मुदकण्णा (रा़मुरूम ता़उमरगा), अंजी श्रीकांत करपे (वय- २० रा़ अणदूर ता़तुळजापूर) हे तिघे जखमी झाले आहेत़ जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले होते़
सोलापूर महानगर पालिकेच्या सीटी बसमधील १९ प्रवाशी या अपघातातून बालंबाल बचावले़ अपघात इतका भीषण होता की बसचालकाने ब्रेक मारल्यानंतर साधारणत: २० फूटापर्यंत रस्ता उखडला होता़ घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि फुलचंद मेंगडे यांच्यासह पोना खलील शेख, नवनाथ बांगर, गोपाळ घारगे, राजीव चव्हाण, अमोल तांबे, सचिन मुंडे, कृष्णा जाधव आदीनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना मदत करून वाहतूक सुरळीत केली़
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़ (वार्ताहर)

Web Title: Bus-car strikes; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.