चऱ्हाटा फाट्यावर फोडली बस

By Admin | Updated: October 12, 2016 23:09 IST2016-10-12T23:01:12+5:302016-10-12T23:09:55+5:30

बीड : येथील चऱ्हाटा फाट्यावर अज्ञात तरुणांनी मंगळवारी रात्री एका बसवर दगडफेक केली. यात बसचे १५ हजारांचे नुकसान झाले.

The bus broke down on the granite | चऱ्हाटा फाट्यावर फोडली बस

चऱ्हाटा फाट्यावर फोडली बस

बीड : येथील चऱ्हाटा फाट्यावर अज्ञात तरुणांनी मंगळवारी रात्री एका बसवर दगडफेक केली. यात बसचे १५ हजारांचे नुकसान झाले.
पुणे येथील चिंचवड आगाराची बस (एमएच ४० एन- ९२७२) बीडकडे येत होती. चऱ्हाटा फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजता दुचाकीवरुन आलेल्या सात जणांनी बस अडवली. त्यानंतर दगडफेक करुन समोरील काचा फोडल्या. चालक विलास पंढरीनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून बुधवारी रात्रीपर्यंत त्यांना पकडण्यात यश आले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The bus broke down on the granite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.