जळालेल्या ‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

By Admin | Updated: May 25, 2014 01:10 IST2014-05-25T00:32:00+5:302014-05-25T01:10:32+5:30

लातूर : दुसरीही मुलगीच झाल्यामुळे पत्नीस पेटविल्याने गंभीर भाजलेल्या विवाहितेचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला़

The 'burnt' of the 'burnt' marriage | जळालेल्या ‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

जळालेल्या ‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

 लातूर : दुसरीही मुलगीच झाल्यामुळे पत्नीस पेटविल्याने गंभीर भाजलेल्या विवाहितेचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू, सासर्‍यास अटक करुन लातूरच्या न्यायालयासमोर उभे केले असता या तिघांनाही २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पूजा निलेश साबळे (२२, रा़ एकुर्गा) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे़ लातूर तालुक्यातील एकुर्गा येथील निलेश तुकाराम साबळे याचा विवाह पूज्या हिच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता़ पूजाला पहिली मुलगी झाल्यानंतर पुन्हा दुसरी मुलगी झाली होती़ त्यामुळे नाराज झालेला पती निलेश साबळे, सासू भामाबाई तुकाराम साबळे आणि सासरा तुकाराम साबळे यांनी संगनमत करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून रविवारी रात्री पेटवून दिले़ त्यात ती गंभीर भाजली़ त्यामुळे तिला उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ गेल्या पाच दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत असताना शनिवारी पहाटे तिचा मृत्यू झाला़ याप्रकरणी पूजा साबळे यांच्या मृत्यूपूर्व जबाबावरुन मुरुड पोलिस ठाण्यात पतीसह सासू, सासर्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी शुक्रवारी रात्री या तिघांनाही अटक केली़ दरम्यान, शनिवारी लातूरच्या जिल्हा न्यायालयासमोर त्यांना उभे करण्यात आले असता २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The 'burnt' of the 'burnt' marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.