शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
2
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
3
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
4
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
5
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
6
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
7
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
8
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
9
“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर
10
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
11
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
12
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
13
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
14
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
15
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
16
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
17
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
18
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
19
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
20
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात

साजापूर रोडवर बर्निंग कार; दोघे भाऊ बालंबाल बचावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:00 PM

साजापूरहून औरंगाबादकडे जात असताना चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साजापूरजवळ घडली. या आगीच्या घटनेत कार भस्मसात झाली असून, नशीब बलवत्तर असल्यामुळे या कारमधील दोघे भाऊ बालंबाल बचावले.

ठळक मुद्देसाजापूरहून औरंगाबादकडे जात असताना चालत्या कारला अचानक आग लागलीया आगीच्या घटनेत कार भस्मसात झाली नशीब बलवत्तर असल्यामुळे या कारमधील दोघे भाऊ बालंबाल बचावले.

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : साजापूरहून औरंगाबादकडे जात असताना चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साजापूरजवळ घडली. या आगीच्या घटनेत कार भस्मसात झाली असून, नशीब बलवत्तर असल्यामुळे या कारमधील दोघे भाऊ बालंबाल बचावले.

या विषयी अधिक माहिती अशी की, शेख फहीम हुसैन (रा. न्यू बायजीपुरा, औरंगाबाद) यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. आज शुक्रवारी दुपारी शेख फहीम हे कार क्रमांक एम.एच.२०, ई.ई.५१२५ घेऊन साजापुरातील वीटभट्टीवर आले होते. या वीटभट्टीवर काही काळ थांबल्यानंतर शेख फहीम व त्यांचे मोठे बंधू शेख वसीम हुसैन हे दोघे कार घेऊन घराकडे जाण्यासाठी निघाले होते. वीटभट्टीवरून काही अंतर पुढे गेल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघत असल्यामुळे कारचालक शेख फहीम यांनी कार थांबविली. यानंतर दोघेही भाऊ कारमधून उतरून बोनेटची पाहणी करीत असताना अचानक गाडीने पेट घेतला. त्यामुळे या दोघा भावंडांनी मदतीसाठी आरडा-ओरड केली असता गावातील नागरिक व रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनधारकांनी या कारकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.

आगीत कार झाली भस्मसातया कारच्या बोनेटमधून धूर निघाल्यानंतर अवघ्या काही क्षणातच कारला आग लागल्यामुळे शेख फहीम व शेख वसीम हे दोघे घाबरून गेले. आग विझविण्यासाठी जवळपास पाणी नसल्यामुळे या आगीची माहिती वाळूज अग्निशामक विभागाला देऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. ही माहिती मिळताच अग्निशामक अधिकारी के.ए. डोंगरे, बी.एन. राठोड, एस.एस. राठोड, आर.ए. चौधरी, आर.एस. फुलारे, ए.ए. चौधरी, ए.जे. गोसावी आदींनी घटनास्थळ गाठून उपसरपंच शेख युसूफ, सय्यद अलीम, शेख अफसर, शेख अन्वर, शेख जमीर, हाजी मुसा पटेल, नईम शेख, वसीम शेख, कलंदर शेख, राजू शेख आदींच्या मदतीने आग विझविली. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत कार पूर्णत: भस्मसात होऊन तिचा केवळ सांगाडा उरला होता.

प्रसांगवधान राखून थांबविली कार साजापूरच्या वीटभट्टीवरून निघताच कारच्या बोनेटमधून अचानक प्रचंड धूर निघत असल्यामुळे शेख फहीम व शेख वसीम या दोघांनी प्रसांगवधान राखत कार थांबवून कारच्या बाहेर पडले. कार विझविण्याचा प्रयत्न करीत असताना आग आणखी भडकून या कारचा कोळसा झाला. नशीब बलवत्तर असल्यामुळे दोघेही भावंडे बचावली आहेत. या घटनेत जवळपास ७ ते ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज कारमालक शेख फहीम यांनी वर्तविला आहे.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबाद