गंगापुरात भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:05 IST2021-05-29T04:05:11+5:302021-05-29T04:05:11+5:30
जयभवानीनगर भागात चंद्रकांत जाधव यांचे निवासस्थान आहे़. जाधव कुटुंब हे घराला कुलूप लावून शुक्रवारी सकाळी कुटुंबासह नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी ...

गंगापुरात भरदिवसा घरफोडी
जयभवानीनगर भागात चंद्रकांत जाधव यांचे निवासस्थान आहे़. जाधव कुटुंब हे घराला कुलूप लावून शुक्रवारी सकाळी कुटुंबासह नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. तीन वाजण्याच्या दरम्यान ते घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला, तसेच कुलूप तुटलेले दिसले. जाधव यांनी घरात जाऊन बघितले असता, घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोनि. संजय लोहकरे, योगेश हरणे, नरके यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकासह, ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते, तसेच सीसीटीव्हीमध्ये एक चोरटा चोरी करताना दिसून आला असून, एक ते दीड वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने जाधव यांच्या घरातील नगदी ३५ हजार रुपये आणि दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.