पेठ बीडमध्ये घरफोडी; सव्वातीन लाख लंपास
By Admin | Updated: July 12, 2016 01:01 IST2016-07-12T00:24:44+5:302016-07-12T01:01:44+5:30
बीड : शहरातील पेठ बीड भागात रविवारी मध्यरात्री लाकडाच्या व्यापाऱ्याचे घर फोडून चोरांनी सव्वातीन लाखांची रोकड लंपास केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पेठ बीडमध्ये घरफोडी; सव्वातीन लाख लंपास
बीड : शहरातील पेठ बीड भागात रविवारी मध्यरात्री लाकडाच्या व्यापाऱ्याचे घर फोडून चोरांनी सव्वातीन लाखांची रोकड लंपास केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
उस्मान खान बहादूर खान (रा. शंहेशाहवली दर्गा, पेठ बीड) यांचा लाकूड कटाईचा व्यवसाय आहे. ते रविारी रात्री आपल्या कुटुंबियांसमवेत जेवण करुन झोपले होते. चोरांनी मध्यरात्रीनंतर खिडकीचे ग्रिल तोडून आत प्रवेश केला. कपाट तोडून त्यातील ३ लाख २१ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यावर खान यांनी पेठ बीड ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर व ठसेतज्ज्ञांनी भेट दिली. श्वानपथकही पाचारण केले होते. (प्रतिनिधी)