घर फोडून दागिने,रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:36 IST2017-10-29T00:36:15+5:302017-10-29T00:36:19+5:30

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घर फोडून घरातील दागिने व रोकड एकूण ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. परिसरातील इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. याप्रकरणी कुरूंदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Burglar home, cash lamps | घर फोडून दागिने,रोकड लंपास

घर फोडून दागिने,रोकड लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घर फोडून घरातील दागिने व रोकड एकूण ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. परिसरातील इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. याप्रकरणी कुरूंदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांगरा शिंदे येथील शंकर मनोहर शिंदे यांचे चोरट्यांनी घर फोडून डब्यातील २५ हजार रूपये किंमतीची सोन्याची नगदरी ९ हजार रुपये चोरट्यांनी पळविले. चोरट्यांनी घरातील वस्तूंची नासधुस करून घरातील वस्तू गावालगत शेतामध्ये फेकून दिल्या. याप्रकरणी शंकर शिंदे यांच्या घरातील एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सदर घटना २७ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून शनिवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली.
गावातील गोविंद शिंदे यांच्या घरातील कपाट फोडून चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसून इतर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचा ग्रामस्थांनी सांगितले आहे. घटनास्थळी सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार प्रशांत भुसे, पोलीस कर्मचारी गजानन भोपे यांनी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.

Web Title: Burglar home, cash lamps