गोविंदपूरमधील घरफोडीचा पर्दाफाश
By Admin | Updated: July 27, 2015 01:11 IST2015-07-27T00:53:59+5:302015-07-27T01:11:05+5:30
शिराढोण : कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील दोन घरफोडीच्या घटनांचा शिराढोण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ या दोन्ही घरफोड्या पाच बालगुन्हेगारांनी केल्याचे समोर आले असून,

गोविंदपूरमधील घरफोडीचा पर्दाफाश
शिराढोण : कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील दोन घरफोडीच्या घटनांचा शिराढोण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ या दोन्ही घरफोड्या पाच बालगुन्हेगारांनी केल्याचे समोर आले असून, पाचही जणांना शिराढोण पोलिसांनी अटक केली आहे़
गोविंदपूर येथील विष्णू सखाराम सौदागर यांच्या घराचा दरवाजा १८ जुलै रोजी फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने रोख ३० हजार ५०० रुपये लंपास केले होते़ तर २२ जुलै रोजी मुक्ताबाई ज्ञानोबा मिसाळ यांच्या घरावरील पत्रा उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता़ घरातील सोन्याचे दागिने व रोख १५ हजार रुपये असा १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता़ या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते़ यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दिपाली धाटे-घाडगे, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संभाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरात या घटनेचा कसून शोध सुरू केला होता़ शिवाय गोविंदपूर येथील काही संशयितांना ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केली होती़ त्यानंतर गोविंदपूर येथील काही अल्पवयीन या चोऱ्या केल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती़ पोलिसांनी पाच जणांना शुक्रवारी अटक करून पोलिसी खाक्यात दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ अटकेतील पाचही जणांना शनिवारी बाल न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे़ ही कामगिरी संजय नायकल, बाबासाहेब मोराळे, शैलेश बनसोडे, प्रशांत राऊत, लक्ष्मण सगर यांनी केली़ (वार्ताहर)