बैल चोरून विकणारा जेरबंद

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T00:11:57+5:302014-06-14T01:20:23+5:30

नळदुर्ग : बैलाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एकास नळदुर्ग पोलिसांनी गुरुवारी रात्री रंगेहाथ अटक केली.

Bullshit | बैल चोरून विकणारा जेरबंद

बैल चोरून विकणारा जेरबंद

नळदुर्ग : बैलाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एकास नळदुर्ग पोलिसांनी गुरुवारी रात्री रंगेहाथ अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील भीमाशंकर गुर्लिंगप्पा तुपे यांच्या शेतातील गोठ्यातून ७ जून रोजी रात्री एक लाख रूपये किंमतीची बैलजोडी चोरीस गेली होती. याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना तपासाअंती अक्कलकोट तालुक्यातील नागनसूर येथील सिद्दाराम श्रीमंत मुदीनकेरी याने ही बैलजोडी चोरून ती अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे एकास विकल्याची माहिती मिळाली. तसेच तो गुरूवारी मैंदर्गी येथे पैसे देण्यासाठी येणार असल्याचेही समजले.
यावरून पोलिसांनी तेथे सापळा लावून सिद्दाराम मुदीनकेरी यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, तुळजापूर न्यायालयाने त्यास १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सिद्दाराम मुदीनकेरी हा स्थलांतर आदेश आणलेला असून, त्याच्याकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सपोनि एम. वाय. डांगे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Bullshit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.