शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचाच्या निकालाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 17:26 IST

वारंवार संधी देऊनही आदेशाची पूर्तता केली नाही

ठळक मुद्देग्राहक संरक्षण कायद्यानुसार आदेश आरोपीने समाधानकारक खुलासा केला नाही जाणीवपूर्वक पालन करीत नसल्याचे मंचाचे मत झाले.

औरंगाबाद : जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी वारंवार संधी देऊनही पूर्तता न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ नुसार दोषी ठरवून, मंचाच्या अध्यक्षा स्मिता बी. कुलकर्णी आणि सदस्य संध्या बारलिंगे यांनी एक वर्ष सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. 

आरोपीने कारावासाच्या मुदतीच्या आत आदेशाची पूर्तता केल्यास त्याची मुक्तता करावी, असे मंचाने आदेशात म्हटले आहे. मंचाने ७ डिसेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशाची पूर्तता न केल्यामुळे मंचाने २६ जुलै २०१९ रोजी वरीलप्रमाणे आदेश दिला. तक्रारदार डॉ. विजयकुमार फुला पाटील आणि डॉ. सुवर्णा विजयकुमार पाटील यांनी मंचात मूळ तक्रार ३ मे २०१६ रोजी दाखल केली होती. मंचाने ७ डिसेंबर २०१६ रोजी आदेश पारित करून गैरअर्जदार बाळासाहेब नामदेवराव पाटील यांनी ३० दिवसांत तक्रारदारांना फ्लॅटचे ताबापत्र (अकुपन्सी सर्टिफिकेट) आणि नोंदणीकृत खरेदीखत करून द्यावे. तसेच ६० दिवसांत लिफ्टचे अर्धवट बांधकाम पूर्ण करून लिफ्ट वापरण्यायोग्य करावे. पार्किंगमध्ये पेव्हर ब्लॉक लावावेत आणि साईड मार्जीनमध्ये काँक्रीट भरावे. उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य वापरून टेरेसचे दोषविरहित वॉटर प्रूफिंग करावे. त्याकरिता तक्रारदाराकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम वसूल करू नये. ही कामे ६० दिवसांत पूर्ण करून योग्य प्रशासनाकडून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवून तक्रारदारास द्यावे, असे आदेशात म्हटले होते. मात्र, आरोपीने दिलेल्या मुदतीत आदेशाची पूर्तता केली नाही. म्हणून अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ नुसार फौजदारी कारवाई दाखल केली होती. दरम्यान आरोपीने काही बाबींची पूर्तता केली. लिफ्टचे काम पूर्ण नसल्याचा अहवाल मंचाने नेमलेल्या ‘कोर्ट कमिश्नर’ने दिला.

मंचचे एकमत : संधी देऊनही खुलासा नाहीआदेशाची पूर्णपणे पूर्तता केली नसल्याबाबत मंचाने आरोपीला विचारणा केली असता त्यांंनी समाधानकारक खुलासा केला नाही. अनेकदा संधी देऊनही आरोपी मंचाच्या आदेशाचे हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक पालन करीत नसल्याचे मंचाचे मत झाले. राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोगाने अशाच प्रकरणांमध्ये दिलेल्या निवाड्यावरून आरोपी शिक्षेस पात्र असल्याबाबत मंचाचे एकमत झाल्याचा उल्लेख करीत मंचाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :consumerग्राहकCourtन्यायालयAurangabadऔरंगाबाद