शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

टीडीआर मिळणार असल्याचे सांगून बिल्डरची ५० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:29 IST

औरंगाबाद : मंजूरपुरा येथील मालमत्तेचा टीडीआर मिळण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केल्याचे सांगून शहरातील एका कुटुंबाने बिल्डरला तो टीडीआर विकून ...

ठळक मुद्देसिटीचौक पोलिसांकडून तपास : एमआयएम शहराध्यक्ष अब्दुल समीर, माजी नगरसेवक अब्दुल सिकंदरसह पाच जणांविरोधात गुन्हा

औरंगाबाद : मंजूरपुरा येथील मालमत्तेचा टीडीआर मिळण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केल्याचे सांगून शहरातील एका कुटुंबाने बिल्डरला तो टीडीआर विकून २५ लाख ५० हजारांचा गंडा घातल्याचे समोर आले. याविषयी सिटीचौक पोलिसांनी एमआयएमचा शहराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल साजीद, त्याचा भाऊ माजी नगरसेवक अब्दुल सिकंदर, अब्दुल सरफराज आणि दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला.सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, महापालिकेने रस्ता रुंदीकरण करताना मंजूरपुरा येथील अनेक मालमत्तेचे संपादन केले होते. दिवंगत अब्दुल साजीद बिल्डर यांनी त्यांच्या संपादित मालमत्तेचा मोबदला महापालिकेकडून घेतला होता. त्यांची मुले अब्दुल समीर, अब्दुल सिकंदर, अब्दुल सरफराज आणि अन्य दोन महिलांना ही बाब माहिती होती. तरीही या कुटुंबाने अब्दुल समीरच्या नावे या जागेसंबंधी व्यवहार करण्यासाठी आम मुख्त्यारनामा करून दिला. त्याआधारे समीरने मंजूरपुरा येथील संपादित जमिनीचा मावेजा म्हणून टीडीआर मिळावा, याकरिता महापालिकेत प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव शहरातील बांधकाम व्यावसायिक अश्विन नंदकुमार तांबी (रा. शिवशंकर कॉलनी) यांना दाखवून महापालिकेकडून मिळणारा टीडीआर त्यांना विक्री केला. ठरल्यानुसार अश्विन यांनी ३० आॅगस्ट २०१६ रोजी आरोपींना इसारा रक्कम म्हणून २५ लाख ५० हजार रुपये दिले. आरोपीच्या वडिलांनी मंजूरपुरा येथील संपादित जमिनीचा महापालिकेकडून मोबदला घेतलेला असल्याचे समोर आल्याने महापालिकेने अब्दुल समीरसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. हे समजताच अश्विन यांनी आरोपींना इसार म्हणून दिलेले २५ लाख ५० हजार रुपये परत मागितले. तीन वर्षांत आरोपींनी त्यांना पैसे परत केले नाही. एवढेच नव्हे तर त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शेवटी अश्विन यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक डी. एस. सिनगारे हे तपास करीत आहेत.चौकटटीडीआर घोटाळ्यात हा चौथा गुन्हा२०१६ साली उघडकीस आलेल्या महापालिकेच्या टीडीआर घोटाळ्यात आरोपींविरुद्ध सिटीचौक, जिन्सी ठाण्यात यापूर्वी ३ गुन्हे नोंद झाले होते. यापैकी २ गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने तर एका गुन्ह्याचा तपास जिन्सी पोलिसांनी केला. आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी अब्दुल समीरला अटक केली होती. आता २ आॅगस्ट रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यात पुन्हा आरोपींवर अटकेची टांगती तलवार आहे.----

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी