केवळ आवास नव्हे खऱ्या अर्थाने घर बनवा
By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:27+5:302020-12-05T04:07:27+5:30
औरंगाबाद : केवळ घरकुल देऊन थांबू नका. सर्वच योजनांच्या मदतीतून लाभार्थ्याला मिळणारे आवास खऱ्या अर्थाने घर ग्रामीण विकास यंत्रणेने ...

केवळ आवास नव्हे खऱ्या अर्थाने घर बनवा
औरंगाबाद : केवळ घरकुल देऊन थांबू नका. सर्वच योजनांच्या मदतीतून लाभार्थ्याला मिळणारे आवास खऱ्या अर्थाने घर ग्रामीण विकास यंत्रणेने बनवावे. संख्यात्मक कामगिरी अपेक्षित असताना उद्दिष्टपूर्तीत गुणवत्तेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या.
महाआवास अभियानाला राज्यभरात सुरुवात झाली आहे. शंभर दिवसांत घरकुलाची स्वप्नपूर्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खा. डाॅ. भागवत कराड, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंग राजपीत, सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, विकास शाखेचे उपायुक्त अविनाश गोटे, जिल्हा परिषद सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. महाआवास अभियानात ग्रामस्तरावर कामगिरी उंचावून जास्तीत जास्त पुरस्कार जिल्ह्यात खेचून आणण्याची अपेक्षा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात सर्व घरकुल योजना मिळून ४० हजार ७२४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते. कोरोना आणि आचारसंहितेमुळे जिल्ह्यात ३१ हजार ६९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत १६ हजार ८८१ घरकुले पूर्णत्वास आली. हे प्रमाण केवळ ४१.४५ टक्के असून, २३ हजार ८४३ घरे अद्याप अपूर्ण आहेत. यात पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, पारधी, आदीम आवास योजनांचा समावेश आहे. अपूर्ण कामांना गती देण्याच्या सूचना डाॅ. मंगेश गोंदावले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कार्यशाळेत दिल्या.