बजेट ५० टक्क्यांवर ?
By Admin | Updated: January 7, 2015 01:05 IST2015-01-07T00:40:07+5:302015-01-07T01:05:01+5:30
औरंगाबाद : महापालिकेचे यंदाचे बजेट ५० टक्क्यांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पन्नाचा घटता आलेख आणि मनपावर झालेल्या कर्जाच्या बोजांचा फटका विकासकामांना बसणार आहे.

बजेट ५० टक्क्यांवर ?
औरंगाबाद : महापालिकेचे यंदाचे बजेट ५० टक्क्यांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पन्नाचा घटता आलेख आणि मनपावर झालेल्या कर्जाच्या बोजांचा फटका विकासकामांना बसणार आहे. सभापती विजय वाघचौरे यांनी आज लेखाविभागाला सुधारित बजेटसाठी पत्र दिले. त्या पत्राच्या आधारे लेखा विभागाने सर्व विभागप्रमुखांना पत्र देऊन झालेली कामे, शिल्लक राहिलेली कामे व संभाव्य होणाऱ्या कामांची यादी मागविली आहे. लागणारा पैसा आणि खर्च झालेला पैसा याचा तपशील विभागप्रमुखांनी लेखा विभागाकडे सादर केल्यानंतर ३१ मार्च २०१५ चे बजेट किती टक्के महसूल गोळा करील याचा अंदाज बांधता येणे शक्य होईल.
विकासकामांवरून पदाधिकारी, नगरसेवकांत वाद होत आहेत. मनपा निवडणुकीची आचारसंहिता मार्च २०१५ मध्ये लागेल. तत्पूर्वी विकासकामे मंजूर करून मतदारांच्या पुढे-पुढे करण्याचा मानस काही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या नगरसेवकांचा आहे. तसेच मागील वर्षातील १०० कोटींची शिल्लक कामे आहेत. या कामांसाठी नगरसेवकांचा आटापिटा सुरू आहे. ही कामे झाली नाहीत, तर अर्ध्याहून अधिक नगरसेवक निवडून येतील की नाही. हे सांगता येत नाही. दरम्यान सभापती वाघचौरे म्हणाले, बजेटचा आढावा घ्यावा लागेल. आजवर किती कामे झाली. किती बाकी आहेत. प्रशासन किती महसूल गोळा करू शकते. त्या अनुषंगाने बजेटसाठी बैठक होईल.