चार दिवसांपासून ५० गावांतील बीएसएनएल सेवा कोलमडली

By Admin | Updated: April 25, 2016 23:26 IST2016-04-25T23:12:49+5:302016-04-25T23:26:33+5:30

वडीगोद्री : परिसरातील चार दिवसांपासून पाच सर्कलमधील तब्बल ५० पेक्षा अधिक गावातील बीएसएनएलची सेवा बंद आहे. त्यामुळे संपर्क बंद

BSNL service in 50 villages in four days collapsed | चार दिवसांपासून ५० गावांतील बीएसएनएल सेवा कोलमडली

चार दिवसांपासून ५० गावांतील बीएसएनएल सेवा कोलमडली


वडीगोद्री : परिसरातील चार दिवसांपासून पाच सर्कलमधील तब्बल ५० पेक्षा अधिक गावातील बीएसएनएलची सेवा बंद आहे. त्यामुळे संपर्क बंद होण्यासोबतच बँक तसेच इतर व्यवहारांवर परिणाम होत आहे. कोलमडलेल्या सेवेला दुरु स्ती करण्यास अधिकाऱ्यांकडून टोलवा टोलवीची उत्तरे मिळत आहेत.
२२ एप्रिल रोजी दुपारनंतर सुखापुरी ते तीर्थपुरी दरम्यान रिंग केबल तुटली होती. त्यामुळे तीर्थपुरी, गोंदी, शहागड, वडीगोद्री, अंकुशनगर या पाचही सर्कलचा संपर्क तुटलेला होता. मोबाईल सेवेसह बँकसेवाही यामुळे पूर्णपणे ठप्प झाल्याने बँकेसह पुर्ण मोबाईल संपर्क बंद आहे. तीन दिवसानंतर या जोडणीस मुहूर्त लागला. ओफसी मशीन एकच असल्याने केबल जोडणीस उशिर लागत असल्याचे चित्र आहे.
बीएसएनएलच्या उपविभागाचे अभियंता महाबोले म्हणाले, केबल तुटलेली आहे. ही केबल जोडणीसाठी ओफसी मशीनची गरज आहे ही मशीन जिल्ह्यात एकच असल्याने सेवेवर परिणाम होत आहे. जर ही मशीन अतिरिक्त असल्यास सेवा सुरळीत झाली असती. परिसरातील बीएसएनएल सेवा लवकरच सुळीत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
बँकेचे कर्ज नवे जुने करण्यासाठी शेतकरी वर्ग सातबारा, आठ-अ काढण्यासाठी सेतु सुविधा वेंसद्रावर गर्दी होत असल्याचे ज्ञानेश्वर छल्लारे यांनी यावेळी सांगितले. बीएसएनएल सेवा बंद असल्याने कामे ठप्प आहेत. सेवा बंद असल्याने ३०० लँडलाईन, १७० ब्रॉडबँड कनेक्शन, ३ हजार बीएसएनल सीमकार्ड बंद असल्याने परिसरातील हजारो नागरिकांना संपर्क साधण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या कार्डचा वापर करावा लागत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.

Web Title: BSNL service in 50 villages in four days collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.