विवाहितेचा गळा दाबून निर्घृण खून

By Admin | Updated: December 27, 2014 00:47 IST2014-12-27T00:40:13+5:302014-12-27T00:47:45+5:30

औरंगाबाद : मोटारसायकल आणि फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणत नाही म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींनी गळा आवळून खून केल्याची घटना हर्सूल परिसरात घडली.

Brutal murder by pressing a brothel | विवाहितेचा गळा दाबून निर्घृण खून

विवाहितेचा गळा दाबून निर्घृण खून

औरंगाबाद : मोटारसायकल आणि फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणत नाही म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींनी गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना हर्सूल परिसरातील एकतानगरातील गायकवाड हौसिंग सोसायटीत घडली.
दीपिका दिनेश नरवडे (२२) असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या खुनाच्या आरोपाखाली नवरा दिनेश नरवडे, सासरा ताराचंद नरवडे, सासू कमलाबाई, दीर ज्ञानेश्वर, भानुदास आणि नंदाई दिलीप साळवे यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सहायक फौजदार अशोक खंडागळे यांची मुलगी दीपिकाचा विवाह काही वर्षांपूर्वी ठेकेदार दिनेश नरवडेसोबत झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी काही महिने तिला गुण्यागोविंदाने नांदविले. नंतर ते किरकोळ कारणांवरून तिला त्रास देऊ लागले. गेल्या काही महिन्यांपासून फ्लॅट आणि मोटारसायकल घेण्यासाठी माहेराहून पैसे आण, असा तगादा सासरच्या मंडळींनी दीपिकाच्या मागे लावला होता. मात्र, ती टाळाटाळ करीत होती. त्यातून तिला शिवीगाळ, मारहाण होऊ लागली. गुरुवारीही असाच वाद झाला. तेव्हा सायंकाळच्या वेळी सासरच्या मंडळींनी चक्क दीपिकाचा गळा आवळला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली.

Web Title: Brutal murder by pressing a brothel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.