शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

जिल्हा परिषदेतील दलालीला बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 9:22 PM

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग वगळता उर्वरित सर्व विभागांतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचे प्रस्ताव यापुढे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाऐवजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांकडून प्रमाणित करून घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग वगळता उर्वरित सर्व विभागांतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचे प्रस्ताव यापुढे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाऐवजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांकडून प्रमाणित करून घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाºयांच्या वैद्यकीय परिपूर्तीची बिले जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत निकाली काढली जात होती. ही बिले निकाली काढण्यासाठी दलालांची मोठी साखळी जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. प्रामुख्याने शिक्षण विभागात अशा दलालांचा मोठा सुळसुळाट आहे. मात्र, दलालांना चाप लावण्यासाठी नुकतेच जिल्हा परिषदेत रुजू झालेले

जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कौर यांच्या निदर्शनास आणून दिले की, अधिकारी-कर्मचारी स्वत: अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने एखाद्या आजाराबाबत खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असतील. त्याबाबतच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीची बिले शासनाकडून मिळविण्यासाठी त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागतो. आतापर्यंत असे प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फतच निकाली काढले जात होते. प्रत्यक्षात मात्र, शासन निर्णयातील तरतुदीनुसार हे अधिकार जि.प. आरोग्य विभाग वगळता अन्य सर्व विभागांच्या अधिकारी-कर्मचाºयांच्या वैद्यकीय परिपूर्तीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती कार्यरत आहे. या समितीने प्रमाणित केलेल्या आजारांच्या उपचारासाठीच खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कौर यांनी तातडीने एक परिपत्रक जारी करून सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या की, यापुढे वैद्यकीय परिपूर्तीची बिले आरोग्य विभागाकडे सादर न करता ती थेट जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे पाठविली जावीत. ‘सीईओं’च्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत दलालांचे धाबे दणाणले आहेत. तथापि, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव मंजुरीचे अधिकार पूर्ववत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाच ठेवावेत, अशी मागणी शिक्षक सेनेने केली आहे.प्रस्ताव केले विभागांना परतयासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वीच आपण पदभार घेतला. तेव्हा अशाप्रकारचे प्रस्ताव आपल्यासमोर आले. आपला अधिकार नसताना आपण ती निकाली का काढावीत, म्हणून ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. शासन निर्णय काय सांगतो, तेही निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. यासंबंधीचे काही प्रस्ताव आपण शिक्षण विभागासह अन्य विभागांना परत पाठविले आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबाद