ब्रॉडबॅण्ड सेवेचे वाजले तीनतेरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:55 IST2017-08-22T23:55:31+5:302017-08-22T23:55:31+5:30
शहरात दोन दिवसांपासून बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा विस्कळीत झालेली असतानाही अधिकाºयांना मात्र त्याचे काहीच सोयरसूतक नाही. उडवाउडवीची उत्तरे देवून अधिकारी मोकळे होत आहेत. आधीच अर्ध्यावर मार्केट खाजगी कंपन्यांनी काबीज केले असताना वरून बंदच्या काळात त्यांना बोनस देण्याचे काम सुरू आहे.

ब्रॉडबॅण्ड सेवेचे वाजले तीनतेरा...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरात दोन दिवसांपासून बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा विस्कळीत झालेली असतानाही अधिकाºयांना मात्र त्याचे काहीच सोयरसूतक नाही. उडवाउडवीची उत्तरे देवून अधिकारी मोकळे होत आहेत. आधीच अर्ध्यावर मार्केट खाजगी कंपन्यांनी काबीज केले असताना वरून बंदच्या काळात त्यांना बोनस देण्याचे काम सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा दिवसेंदिवस ढेपाळत चालली आहे. अधिकाºयांची रिक्त पदे, परभणीहून चालणारा कारभार, कार्यरत अधिकाºयांची उदासीनता या सर्व पार्श्वभूमिवर ग्राहकांना सेवाच मिळत नाही. किरकोळ बाबीसाठीही तक्रार करावी लागते. त्यानंतरही ही समस्या सुटेल, याची शाश्वतीच नाही. शासन एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहात आहे. तर दुसरीकडे शासन अंगीकृत सेवेचेच हे हाल आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करायची कशी? हा प्रश्न कायम आहे. परंतु अधिकाºयांना त्याचे काहीच नाही. नेहमीच वारंगा येथे समस्या उद्भवत असते.
याबाबत स्थानिक अधिकारी निकम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वारंगा येथे पॉवर बँकची समस्या उद्भवली आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पथक पाठविले आहे. ते मॉडेल बदलले जाईल. ते मला जेव्हा कळवतील, तेव्हा ही समस्या दूर होईल. त्यामुळे तोपर्यंत ही समस्या सुटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.