टायपींग परीक्षेत दलालांची लुडबूड

By Admin | Updated: December 3, 2015 00:38 IST2015-12-02T23:57:19+5:302015-12-03T00:38:37+5:30

संजय तिपाले / सोमनाथ खताळ, बीड टंकलेखन व लघुलेखन परीक्षेत कोणीही या अन् परीक्षा देऊन जा... असा सावळा गोंधळ सुरु आहे. परीक्षार्थ्यांच्या गर्दीत बाहेरच्या लोकांची घुसखोरी वाढली आहे.

Brigade in Typing Examination | टायपींग परीक्षेत दलालांची लुडबूड

टायपींग परीक्षेत दलालांची लुडबूड


संजय तिपाले / सोमनाथ खताळ, बीड
टंकलेखन व लघुलेखन परीक्षेत कोणीही या अन् परीक्षा देऊन जा... असा सावळा गोंधळ सुरु आहे. परीक्षार्थ्यांच्या गर्दीत बाहेरच्या लोकांची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे परीक्षार्थी कोण अन् टंकलेखनाच्या ‘स्पीड’चे गुत्ते घेणारे दलाल कोण? यात फरक करणे अवघड बनले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी बुधवारी एका केंद्रावर केलेल्या स्टींगमधून टायपींग परीक्षेचा कसा बाजार भरला आहे याचा पर्दाफाश झाला.
आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने टंकलेखन व लघुलेखन परीक्षेला १ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षांमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजता शहरातील बार्शी नाका परिसरातील अशोकनगर जि.प. केंद्रीय शाळेच्या केंद्रात ‘लोकमत’ प्रतिनिधी धडकले. यावेळी प्रवेशद्वाराजवळ काही तरुण- तरुणी उभे होते. केंद्रातून कोणीही ये- जा करत होते. प्रतिनिधी प्रवेशद्वारातून थेट केंद्रात पोहोचले. तेथे आधीच काही तरुणांची ये- जा सुरु होती. प्रतिनिधी गर्दीतून वाट काढत पुढे गेल्यावर केंद्रात कोण परीक्षार्थी व कोण बाहेरचा व्यक्ती ? हे कळायलाच मार्ग नव्हता. प्रतिनिधी तेथे रेंगाळले, आतमध्ये जाऊन आले; परंतु कोणी हटकले देखील नाही. केंद्र पर्यवेक्षक बाहेर खुर्च्या टाकून बसलेले होते. ये- जा करणाऱ्या तरुणांचा गोंधळ वाढल्यानंतर एक पर्यवेक्षक तेवढे आले अन् गोंंधळ करु नका खाली जा... एवढाच सल्ला त्यांनी दिला. एवढ्यात एक संस्थाचालक पुढे आला अन् त्याने तरुणांना खाली नेले. नंतर प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले. एकूणच केंद्रावरील सारा माहोल संशयास्पद होता.
विशेष म्हणजे केंद्रात प्रवेश देताना प्रवेशपत्र तपासणे गरजेचे आहे, ते देखील तपासले जात नाही. ‘लोकमत’ प्रतिनिधी आदित्यनगरीतील व्यंकटेश स्कूलमधील केंद्रावरही गेले होते; तेथे दोन पोलिस बंदोबस्त करत होते. मात्र, केंद्राला यात्रेचे स्वरूप होते. गर्दीने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. १०० मीटरच्या आत लोक उभे होते.
याबाबत शिक्षणाधिकारी (मा.) एस. पी. जैस्वाल म्हणाले, अशोकनगर केंद्रावर असे काही घडले असेल तर माहिती घेतो. पोलीस बंदोबस्त मागविला होता. यापुढे योग्य ती काळजी घेण्यात येईल.

Web Title: Brigade in Typing Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.