नववधूने लावला वृद्ध नवऱ्याला चुना

By Admin | Updated: May 18, 2016 00:12 IST2016-05-18T00:05:51+5:302016-05-18T00:12:19+5:30

औरंगाबाद : म्हाडा कॉलनीत राहत असलेल्या एका ६८ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्यास साडेचार लाख रुपयांचा चुना लावून अर्धांगिनीने मित्रासह पोबारा केला.

The bride chose the newly married elder | नववधूने लावला वृद्ध नवऱ्याला चुना

नववधूने लावला वृद्ध नवऱ्याला चुना

औरंगाबाद : म्हाडा कॉलनीत राहत असलेल्या एका ६८ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्यास साडेचार लाख रुपयांचा चुना लावून अर्धांगिनीने मित्रासह पोबारा केला. आठवड्यापूर्वीच या वृद्धाशी विवाह करून ही महिला त्याच्या घरी राहायला आली होती, हे विशेष.
शिवानंदन सत्यन हे लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे वीस वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यांना तीन मुले; परंतु नोकरीनिमित्त ते शहराबाहेर वास्तव्यास आहेत. सत्यन हे म्हाडा कॉलनीत घरी एकटेच राहत असत. ३ मे रोजी त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात देऊन वधू संशोधनास सुरुवात केली. आरोपी सलमान शेख व एका ४५ वर्षीय महिलेने शिवानंदन यांच्याशी संपर्क साधला. वाळूज परिसरात त्यांची भेटही झाली. वृद्धाची सर्व माहिती त्यांनी मिळविली. तसेच स्वत:ची नावेही बनावट सांगितली.
शिवानंदन यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. महिला गरजू असल्याने तिला सहारा देण्यासाठी विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आठवडाभरापूर्वी ही महिला म्हाडा कॉलनीत राहण्यासाठी आली. १३ मे रोजी सत्यन हे सामान खरेदी करण्यासाठी मिल्ट्री कँटीनमध्ये गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्या महिलेने गवंडी काम करणारा (पान २ वर)

Web Title: The bride chose the newly married elder