शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जसा अनुभव वाढतो तशी लाचखोरी वाढते; ४० ते ५० वयातील सरकारी बाबू लाच घेण्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 12:25 IST

Anti Corruption cases या कारवाईत पकडण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांमार्फत लाचेची मागणी केली, तर काहींनी त्यांच्यामार्फत लाच घेतली.

ठळक मुद्देलाचेची रक्कमही शासनाकडून तक्रारदाराला लगेच परत केली जाते.वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाई

औरंगाबाद : लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. तरीही सरकारी काम करण्यासाठी लाच घेण्यात ४० ते ५० वयोगटातील कर्मचारी निर्ढावल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. औरंगाबाद परिक्षेत्रात गतवर्षी ४१ ते ५० वयाचे सर्वाधिक ४२ आणि यावर्षी दोन महिन्यांत पाच लोकसेवकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

कोणतेही सरकारी काम सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोफत करणे बंधनकारक आहे. हे काम करण्यासाठी शासनाकडून त्यांना वेतन मिळते. असे असूनही सरकारी अधिकारी, कर्मचारी सामान्यांना वेठीस धरून लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा अनुभव पदोपदी नागरिकांना येतो. लाचखोर लोकसेवकांना पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत गतवर्षी १२६ लोकसेवकांना लाच घेताना पकडले, तर यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या आजच्या तारखेपर्यंत २९ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईत पकडण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांमार्फत लाचेची मागणी केली, तर काहींनी त्यांच्यामार्फत लाच घेतली. लाच घेणाऱ्या सर्वांच्या वयोगटाचा विचार केला असता ४१ ते ५० वयाच्या लोकसेवकांकडून लाचेची मागणी अधिक होत असल्याचे समोर आले.

गतवर्षी २०२० मध्ये औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत ४१ ते ५० वयाच्या ४५ भ्रष्ट लोकांना एसीबीने पकडले. यात तीन खासगी व्यक्तींचा समावेश आहे. यावर्षी दोन महिन्यांत २९ जणांवर कारवाई झाली. यात ४१ ते ५० वयाचे पाच लाचखोर आहेत, तर गतवर्षी २० ते ३० वयोगटातील सर्वांत कमी सहा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि १० खासगी व्यक्तींना लाच घेताना अटक झाली. ३१ ते ४० वयोगटातील २६ सरकारी बाबू आणि १० खासगी व्यक्तींना अटक झाली. सरकारी सेवेतील उतरता काळ म्हणून वयाची ५१ ते ६० हा कालावधी गणला जातो. या वयाचे २८ जण गतवर्षी लाचेच्या जाळ्यात अडकले होते.

२०१८ ते २०२० दरम्यान एसीबीची अशी झाली कारवाई- २०१८ ला १२२ लाचखोरांविरुद्ध गुन्हे नोंदविले .- २०१९ ला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १२४ सापळे रचून १६८ लाचखोरांवर अटकेची कारवाई केली.- २०२० ला औरंगाबाद परिक्षेत्रामध्ये १२६ लाचखोरांवर गुन्हे नोंदवून लाच घेताना त्यांना रंगेहात पकडले.

वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाईतक्रार आल्यावर एसीबीकडुन तातडीने सापळा रचून कारवाई होते. गतवर्षी ४१ ते ५० वयाचे सर्वाधिक लोकसेवक लाच घेताना पकडले गेले हे खरे आहे. आम्ही वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाई करतो. यामुळे लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध नागरिकांनी एसीबीकडे टोल फ्री क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करावी. लाचेची रक्कमही शासनाकडून तक्रारदाराला लगेच परत केली जाते.- डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र एसीबी

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी