शस्त्राचा धाक दाखवून धाडसी दरोडा
By Admin | Updated: May 26, 2017 23:22 IST2017-05-26T23:11:23+5:302017-05-26T23:22:28+5:30
लिंबागणेश : घरातील सदस्यांना खोलीमध्ये कोंडून ठेवत शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना तालुक्यातील लिंबागणेशमध्ये गुरूवारी पहाटे घडली.

शस्त्राचा धाक दाखवून धाडसी दरोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंबागणेश : घरातील सदस्यांना खोलीमध्ये कोंडून ठेवत शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना तालुक्यातील लिंबागणेशमध्ये गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिंबागणेश येथील डॉ.गणेश ढवळे हे नेहमीप्रमाणे आपल्या घरात झोपले होते. कुटुंबातील इतर सदस्या दुसऱ्या घरात झोपले होते. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोरांच्या पायाचा आवाज ऐकूण ढवळे जागे झाले. काही समजण्याच्या आतच त्यांना शस्त्राचा धाक दखवून एका खोलीत बंद करण्यात आले. त्यांच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेण्यात आला.
त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा बेडरूमकडे वळविला. रूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिण्यांसह रोख रक्कम असा एकूण दोन ते अडीचा लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, ढवळे यांचा भाऊ बाजूच्याच घरात झोपले होते. त्यांना दरवाजा वाजण्याचा आवाज आला. त्यांनी घराकडे धाव घेताच दरोखोरांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. ढवळे यांनी नेकनूर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे.