विद्यापीठ युरोपियन कमिशनचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

By Admin | Updated: February 17, 2015 00:43 IST2015-02-17T00:35:11+5:302015-02-17T00:43:53+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूयुरोपियन दौऱ्यावर गेले होते. संशोधनामध्ये विद्यापीठ सक्षम होण्यासाठी आणि इतर देशांमधील विद्यापीठांचे सहकार्य मिळावे,

Brand Ambassador of the University's European Commission | विद्यापीठ युरोपियन कमिशनचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

विद्यापीठ युरोपियन कमिशनचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूयुरोपियन दौऱ्यावर गेले होते. संशोधनामध्ये विद्यापीठ सक्षम होण्यासाठी आणि इतर देशांमधील विद्यापीठांचे सहकार्य मिळावे, यादृष्टीने हा दौरा झाला. दौऱ्यात झालेल्या करारानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युरोपियन कमिशनचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होणार आहे. शिवाय भारतातील विद्यापीठांशी समन्वय साधण्यासाठी आशिया खंडातील रिजनल सेंटर विद्यापीठात उभारण्यात येणार आहे.
कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे आणि बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे हे पाचदिवसीय युरोपियन दौरा संपवून परतले आहेत. या दौऱ्यात ‘युनिव्हर्सिटी आॅफ सॅन्टिगो’ व ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओडियोगो’ या दोन विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओडियोगो’विद्यापीठाबरोबर फॅकल्टी एक्सचेंजचा करार करण्यात आला आहे. यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक तेथील विद्यार्थ्यांना, तर ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओडियोगो’ विद्यापीठातील प्राध्यापक येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
‘युनिव्हर्सिटी आॅफ सॅन्टिगो’ विद्यापीठाबरोबर असलेल्या पूर्वीच्या शिष्यवृत्तीच्या कराराची मुदत वाढविण्यात आली आहे. शिवाय रत्नागिरी येथे विद्यापीठाच्या असलेल्या केंद्रात मरीन सायन्स विभागाचा विकास आणि विस्तार करण्यासाठी या विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. रत्नागिरी येथे मरीन पार्क उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे. भारतातील विद्यापीठांबरोबर समन्वय साधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आशिया खंडातील रिजनल आॅफिस उभारण्यात येणार आहे. याबाबत तेथील विद्यापीठात ठराव होणार असून, यासाठी जागा देण्यास सकारात्मकता दाखविली आहे.

Web Title: Brand Ambassador of the University's European Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.