शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

By बापू सोळुंके | Updated: April 12, 2024 16:59 IST

तुम्हाला चापलूसी करणारी शिवसेना हवी होती, तुमच्या सोबत असलेल्या बंडखोर शिवसेनेला तुम्ही दहा जागा दिल्या, त्यांचे उमेदवार हे तुम्हीच ठरवता.

छत्रपती संभाजीनगरः उद्धव साहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या मोदी आणि शहा यांनी मात्र यापूर्वी शिवसेनेचे अनेकदा उंबरठा झिजवले हे विसरू नये, असे खडेबोल विधान परिषदेची विरोधीपक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सुनावले. सीबीआय ईडी आणि आयकर हे भाजपाचे शाखा कार्यालय झाले असल्याची टीकाही दानवे यांनी केली.

मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचा आरोप केला, याकडे लक्ष वेधले असता आमदार दानवे म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात विकासाचे काय दिवे लावले ? त्यांनी महागाई वर बोलावे, हरघर नल योजनेचे काय झाले असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले प्रत्येकाच्या घरावर छत देणार होते त्याचे काय झाले? आयुष्यमान भारत कार्ड योजनेतून पाच लाखापर्यंत उपचार देण्याचा खोटा प्रचार तुम्ही केला. मात्र आज सोयगाव तालुक्यातील एका मुलीला जळगाव येथे आयुष्यमान भारत योजनेतून उपचार नाकारण्यात आले याकडे दानवे यांनी विरोधकांचे लक्ष वेधले. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले. तरी महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ संपलेला नाही. महायुतीमध्ये आता एकोपा राहिला नाही . उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचे म्हणता परंतु याच शिवसेनेची उंबरठे तुम्ही झिजवले होते असे बोल दानवे यांनी सुनावले.

तुम्हाला चापलूसी करणारी शिवसेना हवी होती, तुमच्या सोबत असलेल्या बंडखोर शिवसेनेला तुम्ही दहा जागा दिल्या, त्यांचे उमेदवार हे तुम्हीच ठरवता. पण उद्धव ठाकरे तुम्हाला शरण येणार नाही. आमची शिवसेना लढा देणारी आहे. आम्ही लढा जिंकण्याचा संकल्प केला असल्याचे दानवे यांनी सांगितले. कोल्हापूर संस्थांची शाहू महाराज यांच्या विषयी महायुतीचे उमेदवाराने अपशब्द वापरले शाहू महाराज हे एका गादीचे वारसदार आहेत केवळ राजकारणासाठी त्यांचा अवमान जनता सहन करणार नाही असे आमदार दानवे म्हणाले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmbadas Danweyअंबादास दानवे