दोघांना रंगेहाथ पकडले

By Admin | Updated: June 22, 2014 00:24 IST2014-06-22T00:17:24+5:302014-06-22T00:24:29+5:30

परभणी : गुन्ह्यामधून नाव काढण्यासाठी आणि जमानती करीता मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले़

Both of them were caught red-handed | दोघांना रंगेहाथ पकडले

दोघांना रंगेहाथ पकडले

परभणी : गुन्ह्यामधून नाव काढण्यासाठी आणि जमानती करीता मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले़
या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ त्यानुसार त्यांच्या भावावर नानलपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामधून त्यांचे नाव काढण्यासाठी व जमानतीकरीता मदत करण्यासाठी नानलपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार राजेश शिंदे व पोलिस नाईक अब्दुल समी हे लाचेची मागणी करीत असल्याचे म्हटले होते़ या तक्रारीनुसार २१ जून रोजी सापळा रचण्यात आला़
त्यावेळी पोलिस नाईक अब्दुल समी मोहम्मद खाजा यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम न्यायालयाच्या परिसरात आणून देण्यास सांगितली़ त्यामुळे न्यायालय परिसरात सापळा लावला असता पोलिस हवालदार राजेश शिंदे यांनी ही रक्कम स्वीकारली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेची रक्कम त्यांच्या ताब्यातून हस्तगत केली आहे़ तसेच दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली़
न्यायालय परिसरात सापळा
२१ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परभणी शहरातील न्यायालयाच्या परिसरात सापळा रचून दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली आहे़

Web Title: Both of them were caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.