शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मध्यमधून दोघांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 24, 2014 01:05 IST

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मंगळवारी दोघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मंगळवारी दोघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेख रफिक शेख रज्जाक यांनी नॅशनल पीपल्स पार्टीच्या वतीने, तर मोबिनोद्दीन खदिरोद्दीन सिद्दीकी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून मात्र मंगळवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.शनिवार आणि सोमवार अशा दोन दिवसांत जिल्ह्यात तब्बल ३२५ इच्छुकांनी ७१२ नामनिर्देशनपत्रे घेतली. आज मंगळवारीही हा ओघ सुरूच राहिला. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मंगळवारी पुन्हा २३ जणांनी ३५ अर्ज घेतले, तर शेख रफिक रज्जाक आणि मोबिनोद्दीन खदिरोद्दीन सिद्दीकी या दोघांनी अर्ज दाखल केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयातूनही १५ जणांनी २९ अर्ज नेले. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात १४ इच्छुकांनी ३४ अर्ज घेऊन गेले. कन्नड, फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर या मतदारसंघांत मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सिल्लोड मतदारसंघात २ अर्ज दाखल झाले. सिल्लोड मतदारसंघात ६ जणांनी १७, कन्नडमध्ये ७ जणांनी १९, फुलंब्री मतदारसंघात ११ जणांनी १९, पैठण मतदारसंघात ८ जणांनी १८, गंगापूर मतदारसंघातून १३ जणांनी २२ आणि वैजापूर मतदारसंघातून २ जणांनी ६ अर्ज नेले. मंगळवारी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत एकूण ९९ जणांनी १९९ अर्ज नेले.