दुचाकी अपघाताच्या दोन घटनांत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:04 IST2021-02-26T04:04:57+5:302021-02-26T04:04:57+5:30

बुधवारी रात्री शिंगी येथील भाऊसाहेब लक्ष्मण बोठे (३१) व त्यांचे नातेवाईक कारभारी रायभान घोडके (४२) हे दुचाकी (एमएच २० ...

Both died in two incidents of two-wheeler accidents | दुचाकी अपघाताच्या दोन घटनांत दोघांचा मृत्यू

दुचाकी अपघाताच्या दोन घटनांत दोघांचा मृत्यू

बुधवारी रात्री शिंगी येथील भाऊसाहेब लक्ष्मण बोठे (३१) व त्यांचे नातेवाईक कारभारी रायभान घोडके (४२) हे दुचाकी (एमएच २० एफई ०९४४)ने जात असताना गावाजवळच त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच २० आयडी.१०६५)ची जोरदार धडक बसली. यात भाऊसाहेब बोठे व कारभारी घोडके जखमी झाले, त्यांना येथील रुग्णालयात दाखल केले असता भाऊसाहेब बोठे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. तर कारभारी घोडके यांना पुढील उपचारासाठी घाटी येथे दाखल करण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत गुरुवारी दुपारी कानडगाव येथील रहिवासी बबन पांडुरंग कानडे (७०) हे दुचाकी (एमएच २० सीएन १८६४)ने गंगापूरहून घरी जात असताना रघुनाथनगर - नेवरगाव रोडवरील ममदापूरजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या शौकत सय्यद हुसेन यांच्या दुचाकी (एमएच १५ एडी १७१५)ची जोरदार धडक बसली. स्थानिकांनी दोघांनाही येथील रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरांनी बबन कानडे यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Both died in two incidents of two-wheeler accidents