दोघे दुचाकी चोर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST2021-09-23T04:06:26+5:302021-09-23T04:06:26+5:30
औरंगाबादेतून चोरलेल्या दोन दुचाकी विक्रीसाठी जालन्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नारायण भिसे, ...

दोघे दुचाकी चोर पकडले
औरंगाबादेतून चोरलेल्या दोन दुचाकी विक्रीसाठी जालन्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नारायण भिसे, अंमलदार आनंद घाटेश्वर, ताराचंद घडे, गणेश कांबळे यांनी येथील हॉटेल गुरुप्रसादजवळ मंगळवारी सापळा लावला. यावेळी दोघे दोन विनाक्रमांक दुचाकीवरून जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी सातारा परिसरातून चोरून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी शुभम महादेव खोत (२४,रा. टाकळी अंबड, ता. पैठण, ह. मु. म्हाडा कॉलनी, देवळाई परिसर), ओमकार अशोक गायकवाड (१९,रा. कल्याण रोड, मोहटादेवीच्या मागे अहमदनगर) यांच्या ताब्यातून दुचाकी (एम एच.२० एफ एफ ५४०८) , दुचाकी (एम. एच.२० इ ए ५८००) असा ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
फोटो: चोरीच्या दोन दुचाकीसह चोरटे करमाड पोलिसांनी पकडले. त्यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, प्रशांत पाटील, सुनील गोरे आदी.