बोरिवली बस वाहकाने अडविली
By Admin | Updated: July 27, 2014 01:14 IST2014-07-27T00:37:25+5:302014-07-27T01:14:59+5:30
उस्मानाबाद : ड्यूटी बदलल्याचे व वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचे कारण पुढे करत एका वाहकाने बोरिवली बस अडवून
बोरिवली बस वाहकाने अडविली
उस्मानाबाद : ड्यूटी बदलल्याचे व वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचे कारण पुढे करत एका वाहकाने बोरिवली बस अडवून जवळपास दीड तास उस्मानाबाद येथील बसस्थानकात धिंगाणा घातला़ त्याच्या या प्रतापामुळे प्रवाशांची मोठी हेळसांड झाली असून, पोलिसांनी त्याला पकडून नेल्यानंतर बस मार्गस्थ झाली़
उस्मानाबाद येथील आगारातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यावरील वाहक-चालकांचे नियोजन आगारातील अधिकारी करतात़ नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास असलेली बोरिवली बस लागली होती़ प्रवाशांनी आसन ग्रहण करताच तेथे आलेल्या एका वाहकाने मनासारखी ड्यूटी दिली नाही, म्हणून धिंगाणा घालण्यास सुरूवात केली़ अधिकाऱ्यांनी त्यास सायंकाळच्या पुणेची ड्युटी टाकली होती़ मात्र, तो वेळेत न आल्याने इतर वाहकास त्या बसवर पाठविण्यात आले होते़ त्या बसच्या प्रवाशांनाही अर्ध्याहून अधिक तास बस हलण्याची वाट पहावी लागली़ वाहकाची समजूत काढण्यासाठी आगारप्रमुख जगताप यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली़ काही माजी अधिकाऱ्यांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, वाहकाची मनस्थिती इतर गाडीवर जाण्याची नसल्याचे लक्षात येताच पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी त्या वाहकास पकडून नेल्यानंतर हा गोंधळ थांबला़ त्यामुळे बोरिवली बस जवळपास अर्धा तास उशिराने मार्गस्थ झाली़ (प्रतिनिधी)
चौकशीअंती कारवाई
याप्रकाराबाबत बोलताना आगारप्रमुख जगताप म्हणाले, रात्री बस अडविण्याचा प्रकार झालेला आहे़ वाहकाचे म्हणणे व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यात येणार आहे़ त्या प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशी अंती कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़
पोलिसांनी वाहकास पकडल्यानंतर थांबला गोंधळ.
बोरिवली बसत जवळपास अर्धा तास उशिराने झाली मार्गस्थ.